>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
भाजपाच्या नेत्यांनी विरोधकांना पराभूत करण्याऐवजी त्यांचे नेतृत्व आणि पक्षांमध्ये फूट पाडून त्यांना कमकुवत करण्याचे राजकारण सुरू केले आहे. परंतु, याला राजकारण नाही तर सत्ताकारण म्हणतात. सत्ता टिकवण्यासाठी भाजपने पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केला आहे.
हेही वाचा : जिल्ह्यात महायुतीचे शिलेदार ठरले ? एक बाण, एक घडी, एक फुल
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. नेत्यांचे विविध पक्षांमधून इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू आहे. गत विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर काहींनी आपल्या पक्षाविरोधात बंड पुकारून भापजसोबत सत्तेत सहभागी झाले.भाजपला सत्ता गमावण्याची भीती वाटते, त्यामुळे विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा : गोसे जलपर्यटनामुळे बदलणार भंडारा जिल्ह्याची ‘दशा आणि दिशा
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात निर्माण झालेले मतभेद मोदी सरकारच्या असुरक्षिततेची साक्ष आहे. सत्ता कायम ठेवणे केवळ हाच हेतु या खेळीमागे आहे. यासाठी त्यांनी राजकीय शिष्टाचाराचा मार्ग सोडून पक्षभेद निर्माण करण्याचा मार्ग अवलंबला. भाजप लोकशाहीच्या मुल्यांपासून दूर जाऊन केवळ सत्तेवर केंद्रीत होत आहे, असा आरोप पटोले यांनी केला.
भाजपचे फोडाफोडीचे राजकारण त्यांना सत्ता संपादन करण्यास सक्षम नसण्याची स्थिती निर्माण करणारे आहे. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण नसून सत्ताकारण आहे. मोदी सरकारने लोकशाहीला डावलले असून फक्त सत्तेचा विचार सुरू केला आहे.
हेही वाचा : 51 फूट उंचीच्या प्रभू श्रीराम प्रतिमेचे होणार अनावरण
विराधकांमध्ये फूट पाडणे म्हणजे भारतीय राजकारणात शक्ती निर्माण करणे नव्हे, तर जनतेची दिशाभूल करणे आहे. मात्र, भारतीय जनता या सत्ताकारणाच्या खेळाला ओळखते. भाजपचे हे धोरण फार काळ टिकणार नाही, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.
सत्तेच्या स्वार्थासाठीच भाजपचे ‘राज’कारण
सरकारने जनतेच्या मतांचा आदर करुन त्यांच्यासाठी काम करावे. पण भाजप तसे न करता सध्या सत्ता टिकवण्याला प्राधान्य देत आहे. भाजपने विरोधी पक्षांमध्ये पाडलेल्या फूटीमुळे राजकीय अस्थैर्य निर्माण होत असून यामुळे लोकशाही व्यवस्थेचा पाया हलतो आहे.
भाजपचे हे राजकारण जनतेच्या भल्यासाठी नाही, तर सत्तेच्या स्वार्थासाठी आहे. लोकशाही आणि राजकीय पारदर्शकतेच्या मूल्यांना धरून राहिले, तरच खऱ्या अर्थाने विकास साधता येईल, अन्यथा नाही, असे पटोले म्हणाले.

