>>>>भंडारा चौफेर | भंडारा प्रतिनिधी
ऐतिहासिक खांब तलावाच्या सौंदर्यात भर घालतानाच, त्याचे धार्मिक महत्त्व जपण्याचा संकल्प सोडलेल्या आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रयत्नातून खांब तलावाचे नवे रूप भंडारेकरांच्या पुढे येणार आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या 51 फूट उंच प्रतिमेचे 10 रोजी खांब तलावाच्या मधोमध होणारे अनावरण एक वेगळी ओळख निर्माण करून जाणार आहे.
हेही वाचा : निकालांमुळे शिंदे, अजितदादांच्या पोटात गोळा? सेना- राष्ट्रवादीचे काय ?
विविध विकासकामांच्या माध्यमातून मतदार संघाचा चेहरा मोहरा पालटण्यासाठी सातत्याने कार्यमग्न राहणाऱ्या भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संकल्पनेतून आणखी नवी ओळख भंडाऱ्याला मिळणार आहे. भंडारा शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या आणि विविध देवी देवतांच्या मंदिराच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या खांब तलावाच्या मधोमध प्रभू श्रीरामाची 51 फूट मूर्ती बसविली जात आहे.
हेही वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा
हे काम पूर्ण झाले असून या मूर्तीचा अनावरण सोहळा 10 ऑक्टोबर रोजी पंचक्रोशीतील संत महंत, मठ, मंदिर आणि विविध तीर्थस्थळातील विश्वस्तांच्या प्रमुख उपस्थितीत वेद मंत्रोच्चारात होणार आहे. यामुळे भंडारा शहराला एक वेगळी ओळख प्राप्त होईल. आमदारांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून पूर्णत्वास गेलेला हा उपक्रम म्हणजे भंडाऱ्याच्या धार्मिक वारशाला अधिक प्रगल्भ करणारा आहे.
या, अनावरण सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध भजन गायक हंसराज रघुवंशी यांच्या भजन संस्थेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अप्रूप सोहळ्याचे साक्षीदार होत दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याच्या आवाहन प्रभू श्रीराम उत्सव व जीर्णोद्धार समिती तथा आमदार नरेंद्र भोंडेकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

