>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने साकोलीत काँग्रेसच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर इच्छूक उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. मुलाखत आटोपली आता उमेदवारीबाबत उत्सूकता लागली आहे.
हेही वाचा : पडघम विधानसभेचे : आता ‘डीएमके’च्या मतांसाठी भाजप नेमणार बूथनिहाय पालक
भंडारा जिल्ह्यातून २२ इच्छूक उमेदवारांनी काँग्रेस
पक्षाकडे निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याबाबत अर्ज सादर केलेत. या उमेदवारांच्या मुलाखती पक्षाच्या वतीने घेण्यात आल्यात. विश्राम भवनात काँग्रेसचे भंडारा जिल्हा विधानसभा निवडणूक निरीक्षक तथा माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांची उपस्थिती होती.

जिल्हा काँग्रेस कमिटीकडे अर्ज सादर करणार्यांसोबतच मुंबईत अर्ज सादर करणार्यांचा मुलाखतीमध्ये सहभाग होता. मुलाखतीच्या अनुषंगाने अनेक उमेदवारांमध्ये उत्सूकता दिसून येत होती. यावेळी अनेक उमेदवारांचे समर्थकदेखील सोबत आले होते.
हेही वाचा : भाजपाचे राजकारण नाही तर सत्ताकारण : आ. नाना पटोले यांचा घणाघात
उमेदवारांनी मुलाखतीदरम्यान त्यांची भूमिका मांडली. या आढाव्याचे इतिवृत्त प्रदेश कार्यालयाला सादर करण्यात येईल, असे भंडारा जिल्हा विधानसभा निवडणूक निरीक्षक माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी सांगितले.
साकोली करिता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनीच एकमेव अर्ज केला होता. तर भंडारा विधानसभेकरिता संदीप डोंगरे, अरविंदकुमार जगने, प्रेमसागर गणवीर, पृथ्वीराज तांडेकर, धनंजय तिरपुडे, विकास राऊत, राजकपुर राऊत, पुजा ठवकर, राजविलास गजभिये, युवराज वासनिक, अरविंद भालाधरे, रोशन जांभुळकर व अतुल टेंभुर्णे यांनी मुलाखत दिली. तुमसरकरिता शंकर राऊत, देवेंद्र ईलमे, प्रमोद तित्तीरमारे, राजेश हटवार, अनिल बाबणकर, खेमराज पंचबुध्दे व रमेश पारधी यांनी मुलाखती दिली.

