>>>>>>विशेष प्रतिनिधी | भंडारा चौफेर
भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चालू शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाच्या प्रवेशाला वैद्यकीय आयोगाने नाकारलेली परवानगी बहाल करण्यात आली असून, यावर्षीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी खासदार सुनील मेंढे यांनी परवानगी नाकारल्यानंतर केलेल्या खटाटोपाला यश आले असून आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला प्रवेश मिळणार आहे.
हेही वाचा : Exit Poll : हरियाणात भाजपची हॅट्ट्रीक हुकणार? 10 वर्षांनी कोण येणार सत्तेत?
भंडारा जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी तत्कालीन खासदार सुनील मेंढे यांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पदरी पाडून घेतले होते.
हेही वाचा : गोंदियाचे विनोद अग्रवाल यांचे निलंबन मागे
वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली जागाही मिळवून बांधकामाच्या दृष्टीने सर्व प्रक्रिया त्यांच्या काळात पूर्णत्वास गेली होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महाविद्यालयाला येऊन भेट देत तपासणी केली असता, त्यात त्यात काही त्रुट्या आढळून आल्या होत्या. यामुळे आयोगाने चालू शैक्षणिक वर्षात एमबीबीएस प्रथम वर्षाच्या प्रवेशाला परवानगी नाकारली होती.
हेही वाचा : कुठे नेऊन ठेवला नेत्यांनी भाजप ?
यामुळे डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या अनेक तरुण-तरुणींमध्ये नैराश्य पसरले होते. दरम्यान, हा विषय कळताच माजी खासदार सुनिल मेंढे यांनी, कुठल्याही परिस्थितीत याच शैक्षणिक वर्षांपासून प्रवेश होतील असे स्पष्ट केले होते. प्रवेशासाठी परवानगी आणण्याच्या दृष्टीने त्यांनी केंद्रस्तरावर दिल्लीला मंत्री आणि अधिकाऱ्यांशी भेटून वस्तुस्थिती पटवून दिली.
हेही वाचा : गावकारभाऱ्यांचे मानधन अन् रुबाबही वाढला : शासनाचा बळ देणारा निर्णय
महाविद्यालय प्रशासनाला त्रुट्या दूर करण्यासंदर्भात सूचना केल्या गेल्या. या सर्व खटाटोपाचा परिणाम राज्यातील ज्या आठ महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे त्यात भंडाऱ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही घोषणा केली. प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार चालू शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाला 100 विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील असे बोलताना सांगितले.
केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे अनेक भावी डॉक्टरांचे स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले जाणार आहे. माजी खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुरावा आणि संपर्कातून गेलेली परवानगी मिळाल्याने भावी डॉक्टरांनी त्यांचेही आभार मानले आहेत.
ही आनंदाची बातमी: मेंढे
नाकारलेली परवानगी परत येऊन प्रत्यक्ष प्रवेशाला सुरुवात होणार आहे. ही बातमी नक्कीच आनंद देणारी आहे. असंख्य तरुण-तरुणींचे स्वप्न पूर्ण होण्याची ही सुरुवात आहे. भंडारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अनेकांचे स्वप्न होते ते पूर्ण झाले आहे. भविष्यातही या महाविद्यालयाच्या अनुषंगाने कोणत्याही अडचणी आल्यास आपण कायम विद्यार्थी आणि व्यवस्थापनाच्या पाठीशी असू, अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुनील मेंढे यांनी दिली.