>>>>>भंडारा चौफेर | भंडारा प्रतिनिधी
भंडारा जिल्हा हा भातपिकासाठी आणि तलावांसाठी प्रसिद्ध आहे. नैसर्गीक संपदा मोठ्या प्रमाणात आहे. वनसंपदा आणि जलसंपदा ही भंडारा जिल्ह्याला मिळालेली बहुमोल देणगी आहे. परंतु, या नैसर्गीक देणगीचा जिल्ह्याच्या विकासासाठी पर्यायाने जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरीकांच्या विकासासाठी वापर व्हावा, याचा विचार केल्या गेला नाही.
हेही वाचा : भंडाऱ्याला मिळणार नवी ओळख : 51 फूट उंचीच्या प्रभू श्रीराम प्रतिमेचे होणार अनावरण
मात्र भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आ. नरेंद्र भोंडेकर यांनी नैसर्गीक देणगीचा वापर नागरीकांच्या विकासासाठी कसा करता येईल याचा विचार केला आणि त्यातुन भंडारा जिल्ह्यात जलपर्यंटना सारखा अशक्य वाटणारा प्रकल्प उभा राहतो आहे. हा केवळ प्रकल्प नाही तर येणार्या काळात भंडारा विधानसभा क्षेत्राचीच नाही तर संपुर्ण भंडारा जिल्ह्याची दशा आणि दिशा बदलविणारा ठरणार आहे.
या जल पर्यटनाबाबद आ. भोंडेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले कि, पहिल्यांदा मी आमदार झालो तेव्हा कामकाज शिकण्यात तीन वर्षे गेलीत, परंतु भंडार्याचा विकास करणे हा ध्येय करूनच विधानसभेत पाय ठेवला होता आणि हेच कारण होते की २०१४ साली पराजित झाल्यावरही मतदार क्षेत्र सोडले नाही किंवा मी हार न मानता उलट जास्त कामे केली आणि पुन्हा २०१९ मध्ये अपक्ष का होईना मतदारांनी मला पुन्हा एकदा विधानसभेच्या दारात पाठविले.
हेही वाचा : निकालांमुळे शिंदे, अजितदादांच्या पोटात गोळा? सेना- राष्ट्रवादीचे काय ?
सुरुवातीचा काळ कोरोना महामारी निस्तारण्यात गेला. पण गेल्या अडीच वर्षात, मी माझ्या भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रात जेवढी कामे केली तेवढी कामे कोणत्याही आमदाराला त्याच्या कार्यकाळात करता आली नाही. रस्ते, नाल्या, समाजभवन इत्यादी विकासकामे प्रत्येकच आमदार करतो मात्र रोजगार, आरोग्य आणि समाजकारण यावर माझा विशेष भर असल्याचे सांगीतले
गेल्या अनेक वर्षापासून भंडारा-पवनी विधानसभ क्षेत्रातील जनतेने केवळ उपेक्षाच अनूभवली आहे.
मात्र या भागात खर्या अर्थाने विकासाची गंगा आणण्याचे काम जर कुणी केले असेल तर ते भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्राचे आ.नरेंद्र भोंडेकर यांनी केला. हे भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रातील विकासकामाचा लेखाजोखा केल्यावरुन दिसुन येते. संवाद साधतांना आ.नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रातील त्यांच्या विकासाचा संपुर्ण लेखाजोखा जनतेसमोर मांडला.
हेही वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा
भंडारा-पवनी मतदार संघात गेल्या ५ वर्षात ३ हजार ५०० कोटी रूपयाची विकासकामे आपण खेचुन आणल्याचे आ.भोंडेकर यांनी सांगीतले. ज्यात सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे गोसे जल पर्यटन. गोसे जलपर्यटन हे भारतातील आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. भंडारा जिल्ह्याला जल पर्यटन या प्रकल्पामुळे खर्या अर्थाने केवळ नावलौकीकच मिळणार नाही तर या प्रकल्पातुन तब्बल १० हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
गोसेखुर्द येथील सदैव पाणी भरलेल्या धरणाचा उपयोग भंडारा जिल्ह्यातील नागरीकांच्या उत्थानासाठी व्हावा यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मनाशी निश्चय केला. त्यांच्या ध्येय निश्चितीतून जागतिक दर्जाचे जलपर्यटन गोसेखुर्द सिंचन प्रकल्पावर साकारण्यात येत आहे.
ज्यात भंडारा १ व २, कोरंभी, पहेला/ मौदी, अडयाळ/चकारा, गोसे, कारधा, मांडवी, खमारी, मकरधोकडा, नेरला व जवाहरनगर येथून पर्यटकांकरिता प्रवेशद्वार तयार करण्यात येणार असुन आता भंडार्यातच जेटस्की, बोट हाऊस, क्रुज चे आनंद घेत येणार आहे. ज्याकरिता २४५ कोटींच्या कमाल सुरुवात झाली असल्याचे आ.भोंडेकर यांनी सांगीतले.

