चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: उपमुख्यमंत्र्यांच्या जनसन्मान यात्रेत गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकाऱ्याची पडद्यामागुन दबंगगिरी.?
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > ताज्या बातम्या > उपमुख्यमंत्र्यांच्या जनसन्मान यात्रेत गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकाऱ्याची पडद्यामागुन दबंगगिरी.?
ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्र्यांच्या जनसन्मान यात्रेत गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकाऱ्याची पडद्यामागुन दबंगगिरी.?

समाज माध्यमावर व्हायरल ऑडिओ क्लिपची होतेय खमंग चर्चा

चौफेर वार्ता
Last updated: September 29, 2024 10:09 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

भंडारा : तुमसर येथिल नेहरु मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियोजित जन सम्मान यात्रेची सभा आयोजित करण्यात आली होती. त्या करीता शासकिय प्रोटोकॉल नुसार सदर कार्यक्रमात उपस्थित राहुन जन सम्मान यात्रेला सहकार्य करण्याचे अपेक्षित असताना सदर मुख्याधिकारी गैरहजर राहुन आपल्या कर्तव्याला विसरली असतांना या संदर्भात लोकप्रतिनिधी आ. राजू कारेमोरे यांनी मुख्याधिकारी यांना सभेला सहकार्य करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

आमदार महोदयांच्या सुचनेला त्या नगरपालिकेच्या प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी न जुमानता चक्क गैरव्यवस्थेला पाठबळ दिली असल्याने आमदारांनी भ्रमणध्वनीवरून संबधित मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिली. पऱतु येथिल मुख्याधिकाऱ्यांनी चक्क भ्रमणध्वनीवरील आपली ऑडिओ क्लिप तुमसर शहरातील सोशल मीडियावर घातली असल्याने एकच खळबळ उडाली? सदर ऑडिओ क्लिप मध्ये प्रोटोकॉल संबंधित लोकप्रतिनिधी यांनी त्या अधिकाऱ्या विरोधात संताप व्यक्त केला असला तरी येथे विरोधकांकडून नाहक बाऊ करीत असल्याचा प्रकार सुध्दा समोर आला आहे.

परिणामी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा प्रोटोकॉल तोडनाऱ्या त्या प्रभारी मुख्यधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार का.? या आधी करिश्मा वैद्य यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कारवाई सुद्धा झांली होती.असे अनेक तक्रारीची शासकीय दफ्तरात नोंद सुध्दा असल्याची माहिती समोर आली आहे.असा सवाल आता तुमसर शहरातील नागरिकांतून विचारला जात आहे.

सदर प्रकरणी तुमसर शहरात जोरदार खमंग चर्चा सुरू असली तरी येथे संबंधित मुख्यधिकाऱ्या विरोधात खेद व्यक्त केला जात आहे.परिणामी वातावरण बिघडत चालले आहे.संबधित मुख्याधिकाऱ्याने ती वैयक्तिक ऑडिओ क्लिप व्हायरल कुणाच्या सांगण्यावरून व्हायरल कशी केली?

याविषयी चौकशी होणे गरजेचे आहे.वास्तविक शहराच्या ठिकाणी राज्य स्तरावरील अतिमहत्त्वाचे पदाधिकारी येणार असेल तर अशा बाबतीत स्थानिक अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सदर कार्यक्रमाची व्यवस्था सांभाळणे,हाताळाने
किंबहुना मदत करणे क्रमप्राप्त आहे.

परंतु येथे सहकार्य न करता कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानिक नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका घेतल्याची बाब समोर आली आहे.परिणामी स्थानिक आमदार यांनी संबंधित नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख म्हणून मुख्याधिकारी याला विचारणा करणे हे क्रमप्राप्त ठरते. आणि स्वतः त्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत पाहणी न करणे उचित उपाययोजना न करणे याकरिता त्याला तंबी दिली.शहरात यापूर्वी प्रामाणिक कर्तव्यदक्ष तात्कालीन मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांची तुमसर नगर परिषद येथून बदली झाल्यापासून शहरातील वातावरण दुषित होत चालले आहे.सदर जनसन्मान यात्रेत हजारो नागरिक उपस्थित झाल्याने विरोधी व असंतुष्ट राजकिय नेत्यांच्या पोटात दुखने झाले.

परिणामी असंतुष्ट राजकीय पदाधिकाऱ्यांनी ऑडिओ व व्हिडीओ वायरल केल्याची चर्चा आहे?त्या संबंधि मुख्याधिकाऱ्यानी आपली जवाबदारी झटकून उपमुख्यमंत्री यांच्या प्रोटोकॉलला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे येथे संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधी, उपमुख्यमंत्र्यापेक्षां मोठे झाले वाटते?तर याला पडदामागून कुणाचा राजकीय आशिर्वाद आहे? तर या अधिकाऱ्या वर शिस्तभंगाची कारवाई कधी होणार?अशी जनमानसात चर्चा होत आहे.

जनसम्मान यात्रेत अपेक्षेप्रमाणे नागरीकांची मोठी गर्दी झाली असल्याने विरोधकांच्या पोटात दुखने सुरु झाले आहे. परिणामी राजकीय विरोधक समाजा माध्यमावर आडिओ क्लिप व्हायरल करुन माझी बदनामी करुन माझ्या बोलण्याचा विपर्यास लावत आहेत.संबधित प्रभारी मुख्याधिकारी करिश्मा वैद्य याना मी उपमुख्यमंत्री जनसम्मान यात्रेच्या कार्यक्रमा व्यवस्थे‌ संबधी भ्रमणध्वनीवरून प्रोटोकॉल नुसार सुचना दिल्या होत्या.यात कुठलिही धमकी दिली नाही.

–आमदार
राजु कारेमोरे, तुमसर -मोहाडी विधानसभा क्षेत्र

मला कोणत्याही ऑडियो क्लिपची कल्पना नाही. सध्या मी रुग्णालयाच्या कामात व्यस्त आहे.कृपया मला उद्या काॅल करा.

-करीश्मा वैद्य.
प्रभारी मुख्याधिकारी
न.प तुमसर.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article गडेगाव येथून राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरूवात
Next Article भावा, साकोली मतदारसंघात इच्छुकांचीच हवा…एका मतदारसंघात तीन तालुके असल्याने चढाओढ वाढली
जिल्हा दूध-संघ निवडणुकीत टाय ; सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच
चौफेर वार्ता राजकारण
शिवसेना-भाजप वाद विकोपाला; फुके-भोंडेकर आमनेसामने
चौफेर वार्ता राजकारण
Milk union election : नाना पटोले-नरेंद्र भोंडेकर यांचा एकत्रित लढा
राजकारण विदर्भ
जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व कायम     
राजकारण विदर्भ
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account