>>>>>संदीप नंदनवार
“मोडून पडला संसार सारा.., तरी मोडला नाही कणा…, पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा!”
या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या उक्तीप्रमाणे पाठीवर कुणाचातरी हात असावा. त्याने आपल्याला लढ म्हणावे एवढीच माफक अपेक्षा असणाऱ्या बळीराजाला तेही नशिबात कधी मिळाले नाही. सन 2019 ते 2024 या पाच वर्षात राज्यात अस्तित्वात असलेल्या सर्वच पक्षानी सत्तेची चव चाखली. सर्वांनाच शेतकऱ्यांचा पुळका होता, हे ही ‘राज’करतानी दिसले. मात्र, या सत्ताधाऱ्यांकडून व भुमीपुत्र, शेतकऱ्यांचे कैवारी असे बिरुद लावून मिरविणाऱ्या नेत्यांकडून शेतकरी आजही उपेक्षीतच जीवन जगत आहे.
हेही वाचा : हे गणराया ! आमदार होऊ दे रे बाप्पा…
जगाचा पोशिंदा अन्नदाता म्हणून ज्याचा आपण गौरव करतो तो शेतकरी आजही अनेक संकटांचा सामना करत आहे. तरी उद्याच्या आशेवर तो नेटाने शेतामध्ये राबतो आहे. आपल्या शेतामध्ये खपतो आहे. प्रत्यक्ष बळीराजाची स्थिती विचार करण्यासारखीच आहे. तो आज चारी बाजूंनी अडचणीत आहे. अस्मानी बरोबर राजकारण्यांचा सुल्तानी कारभाराचा धडा त्याच्यापर्यंत पोहोचत आहेत. ज्या नावाने आता अन्याय, अत्याचार, संघर्ष ओळखला जातो ते नाव आज शेतकरी म्हणून ओळखले जाते. अशी दुर्दैवाची वेळ या जगाचा पोशींदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवर आलेली आहे.
हेही वाचा : चूक शासनाची अन् रोष मात्र सरपंचांवर
राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीची व आता महायुतीची अन देशात शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या राजकीय पक्षाची सत्ता आहे. वेगवेगळ्या पक्षाचे राज्यप्रमुख शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करतात व शेतकऱ्यांचे आपणच कैवारी असल्याचे निवडणुकीच्या दरम्यान आव आणतात व शेतकऱ्यांचा वाली कुणीच नाही असे सांगतात.
तेव्हा असे थेट फर्मान काढल्यागत नेता बेपर्वाहीने वल्गना करतो तेव्हा शेतकऱ्यांची अवस्था दिसून येते. स्वप्नांच्या दुनियेतले अच्छे स्वप्ने दाखवत सर्वसामान्यांना भुरळ पाडून हस्तगत केलेल्या सत्तेचा कृतज्ञता फेडण्याचा प्रकार सर्वसामान्य शेतकऱ्यांच्याच माथी पुन्हा एकदा आल्याचे दुर्दैव हे महाराष्ट्रासाठी व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी नवे आहे असे नाही. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या शे-दोनश्यांची कर्जमाफी करत शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा धंदा या राजकारण्यांनीच केला.
हेही वाचा : भंडाऱ्याचा पैलवान कोण ?
जर या राजकारण्यांना कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील अनुभवच नव्हता असे जाहीर करावे लागते. हेच राजकारणी नियोजन चुकले हे धडधड सांगतात. यावरून या शेतकऱ्यांच्या नावावर मते मागून राजकारण्यांच्या सरकार चालवण्याच्या एकूण कौशल्यावर प्रश्नचिन्ह आपोआप निर्माण होत आहे. सत्ताधाऱ्यांच्या धोरणांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडणारे विरोधी पक्षांची भूमिका या राज्यात अत्यंत नगण्य आहे.
हेही वाचा : दिवाळीनंतर विधानसभेचा धुरळा उडणार ?
राज्यात मुख्य विरोधी पक्षांची काही मोजकीच नेतृत्वे सत्तेच्या विरोधात भांडत आहेत. विरोधकांच्या मरगळीतून सत्ताधाऱ्यांचे फावते आहे. मात्र, बऱ्याच काळापासून सत्ता भोगून तृप्त झालेले विरोधक आता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्यास अनुत्सुक दिसून येत आहेत.
लढाई तुलेच लढा लागते, बाकी कोणी खाली नाह्यी..!
निवडमुकीच्या तोंडावर राजकारण्यांची चाल व आजच्या परिस्थितीचे गांभीर्य बळीराजा ओळखून आहे. संकटा मागून संकटांची मालिका सुरू असताना पडणे, पुन्हा उभे राहणे, पुन्हा पडणे बळीराजाचा क्रम सुरू आहे.
मात्र यापुढे कोणतीही आर्थिक नुकसान सहन करण्याची ताकद बळीराजा मध्ये राहिलेली नाही, हे राजकारण्यांनी ऐकून घेणे गरजेचे आहे. त्याच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. नाहीतर सामुहिक होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक गट तयार होतो तेव्हा जगात क्रांती होते हे इतिहासाने दाखवून दिले आहे.
जगाला जगवण्याची जबाबदारी त्याने एकट्याने अंगावर घेतली असली तरी त्याला आधार देण्याचे काम आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे. आजघडीला शेतकऱ्यांचा वाली हा शेतकरीच आहे. विदर्भाचे एक नामवंत कवी वैभव अनिल भिवरकर यांनी शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीत लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढे यायला पाहिजे हे त्यांच्या कवितेतून सादर केले आहे.
“कर्ज बुडलं तं बुडू दे,
ह्या देश बुडणार नाह्यी..!
एंडरीनचा डबा कधीबी हाती घ्या’चा नाह्यी…!
ते मतं द्या म्हणले का,
दाखून दे रे पावर तू ..!
सरसकट लंबे कर,
निवडून आण वावर तू…!
पंजी, कमली, घडाय, बाण, तुह्यं कोणी वाली नाह्यी…!
लढाई तुलेच लढा लागते,
बाकी कोणी खाली नाह्यी…!
उठं बावा आसू पुस, माणूस माणसाचा नाह्यी…!”