रवि भोंगाने | भंडारा चौफेर
साकोली | स्थानिक विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार राजेश उर्फ बाळा काशीवार यांचा १० सप्टेंबर रोजी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी वाढदिवस जल्लोषात, धुमधडाक्यात साजरा केला.
कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याचा,वरिष्ठांचा वाढदिवस साजरा करावा त्याकरिता नशिब पाहिजे.त्याही आधी वरिष्ठांचे कार्यकर्त्यावर मनापासून निस्सीम आणि निरपेक्ष प्रेम असावे लागते.
तेव्हाच नेत्यांचे असे इव्हेंट आपोआप तयार होतात. त्यात बाळाभाऊ नशीबवान ठरले असे म्हणायला हरकत नाही.संघाशी आणि पक्षाशी प्रामाणिक असलेले बाळाभाऊ यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद क्षेत्रापासून सुरू होऊन आमदारकी पर्यंत स्वल्प विराम ठरला. बाळाभाऊ यांचा २५ वर्षाचा प्रवास उलगडला तर बाळाभाऊ या आधी कंत्राटदार होते.
कंत्राटदार,जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार असा प्रवास राहिलेला आहे. पण या प्रवासादरम्यान त्यांनी पक्षाशी, कार्यकर्त्यांशी,पक्षाच्या धोरणाशी आणि संघाशी कधीही फारकत घेतली नाही.याला म्हणतात निष्ठा.म्हणूनच शेकडो कार्यकर्ते बाळाभाऊंच्या निवासस्थानी गर्दी करून त्यांचा वाढदिवस साजरा करतात. बाळाभाऊंच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाऊंच्या वाढदिवसाला आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवले.
बाळाभाऊ यांची आजही विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांशी,मतदारांशी नाळ अद्यापही जुळून आहे. बाळाभाऊचा स्वभावच असा आहे की ते दाखवीत नाही. देखावापणा करणे त्यांच्या स्वभावात नाही. प्रत्यक्षात भाजप मतदाराशी त्यांची घट्ट वीण जोडलेली आहे. म्हणूनच बाळाभाऊंच्या वाढदिवसाच्या शुभेच्छासह दुसऱ्यांदा आमदार व्हावे याही करिता कार्यकर्त्यांनी मतदारामार्फत शुभेच्छा दिल्यात.
देशप्रेम आणि धर्माविषयी नेहमीच जागृत राहून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी राबविलेले उपक्रम आज जनतेच्या अंतर्मनात कोरलेले आहेत. मग ते परेड ग्राउंड वरील दही हंडी असो, लहरीबाबा मठ प्रांगणातील शिवाजी महाराज जयंती असो, २६ जानेवारीला”राष्ट्रप्रथम “यावर अभिनव जनजागृती असो किंवा “वंदे मातरम” अभियान असो. यासारखे राष्ट्रहिताचे अनेक उपक्रम बाळाभाऊ यांनी आपल्या कारकीर्दीत राबविलेत.
त्याची जनता साक्षीदार आहे.नेहमीच निष्ठापूर्वक जनतेसमोर राष्ट्रप्रेमाची भावना,जनजागृती करण्यास बाळाभाऊ अग्रेसर राहायचे,नव्हे ते आताही आहेत. देशाविषयी अभिमान कसा असावा हे बाळाभाऊ यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. अशावेळी बाळाभाऊ पुन्हा एकदा आमदारकीला उभे राहिले तर नवल नाही.त्यातही कार्यकर्त्यांनी जर पुढील आमदारकीसाठी बाळाभाऊ कडून अपेक्षा केली असेल तर त्यात नवल अजिबात नाही. कारण तो कार्यकर्त्यांचा प्रेमापोटी असलेला अधिकार आहे.

