>>>>>भंडारा चौफेर | विशेष प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्यासाठी विधानसभेची घोषणा केली. आता महाराष्ट्रातील विधानसभेची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. या दोन्ही राज्यांचा निकाल येत्या चार ऑक्टोबर रोजी लागणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेची घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना बघायला मिळाला होता. आता विधानसभेसाठीही असाच सामना होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
हेही वाचा : महाविकास आघाडी दीडशे पार ? भाजपची झोप उडवणारा सर्व्हे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना दिवाळीनंतर निवडणुका होतील असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ८ ऑक्टोवर ते १० ऑक्टोवर दरम्यान आचारसंहिता लागू होऊ शकते. आचारसंहितेचा काळ एक महिन्याचा असतो.
मागच्या विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोवर २०१९ रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. त्याचा निकाल २४ ऑक्टोवर रोजी लागला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया २६ नोव्हेंबरपूर्वी होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल.
२०२४ च्या विधानसभेसाठी आचारसंहिता कधी लागणार ?
राज्यात मागच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांसोबतच करण्यात आली होती. मात्र, यंदा केंद्रीय निवडणूक आयोगाने आधीच हरियाणा आणि जम्मू-काश्मीर राज्याच्या विधानसभेची घोषणा केली आहे २०१९ साली महाराष्ट्रात २१ सप्टेंबर २०१९ ला आचारसंहिता लागू झाली होती. मात्र, यंदा म्हणजे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नोव्हेंबर महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता असून डिसेंबर महिन्यात मतदान आणि त्याच्याच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी निकाल लागणे अपेक्षित आहे.
सण २०१९ ची विधानसभा निवडणूक कधी झाली ?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकाच फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात २८८ जागांसाठी मतदान झालं होतं. त्याचा निकाल लगेचच २४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला. यात शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. परंतु सरकार स्थापनवेरील मतभेदानंतर, महायुती विसर्जित झाली आणि राजकीय संकट उभे राहिले.
कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन न करता आल्याने मंत्रिपरिषद झाली नाही आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
हेही वाचा : …ते फर्मान सोडणारा तो ‘कटप्पा’ कोण?
या दोघांनी २६ नोव्हेंबर २०२९ रोजी बहुमत चाचणीच्या आधीच राजीनामा दिला. तर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी या नवीन युती अंतर्गत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडली. त्यात ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवार यांनी महायुतीत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवार बारामतीतूनच लढणार ?
बारामती विधानसभेतून अजित पवार लढणार की नाही ? यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. मात्र, अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. अजित पवार गटाची अलीकडे एक महत्त्वाची वैठक पार पडली.
हेही वाचा : साकोली विधानसभेत “लाडक्या बहिणीला” प्रतिनिधित्व मिळणार काय?
या बैठकीत अजित पवार वारामतीतूनच लढणार असल्याचे जवळपास शिक्कामोर्तव करण्यात आले. यातच आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटातील संभाव्य २५ जणांची यादी समोर आली आहे. लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा वारामतीतून लढणार नसल्याच्या चर्चा होत्या.
मात्र, अजित पवार वारामतीतूनच लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच छगन भुजवळ येवला, दिलीप वळसे-पाटील आंबेगाव, धनंजय मुंडे परळी, कागलमधून हसन मुश्रीफ, दिंडोरी विधानसभेतून नरहरी झिरवळ यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार आहे. त्याचवरोवर रायगडमधून अदिती तटकरे, अहमदनगरमधून संग्राम जगताप, खेड-आळंदीतून दिलीप मोहिते- पाटील, अहेरीतून धर्मराववावा आत्राम, कळवणमधून नितीन पवार, इंदापूरमधून दत्ता मामा भरणे यांना उमेदवारी दिली जाणार आहे

