चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: अमित शहांनी दिला विजयाचा कानमंत्र !, काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना रोखा
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > महाराष्ट्र > अमित शहांनी दिला विजयाचा कानमंत्र !, काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना रोखा
महाराष्ट्रराजकारण

अमित शहांनी दिला विजयाचा कानमंत्र !, काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना रोखा

चौफेर वार्ता
Last updated: September 26, 2024 3:34 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>>भंडारा चौफेर | नागपूर प्रतिनिधी

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने दुःखी होण्याचे कारण नाही. एवढी वाईट स्थिती आपली नाही. केंद्रात आपलीच सत्ता आणि पंतप्रधान असल्याचे सांगून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी फक्त १० टक्के मतांचा टक्का वाढवा विजय आपलाच असल्याचा कानमंत्र दिला आहे.

हेही वाचा : जनतेच्या मनातल्या ‘CM’ चा अस्तित्वासाठी संघर्ष !मुंडे, खडसेंनंतर आता ठाकरेही त्याच रांगेत ?

विदर्भातील कार्यकर्ता संवाद बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी कार्यकत्यांना बूस्टर डोस दिला. निवडणूक जिंकण्यासाठी नुसता जोश नको तर होशही हवा आहे, असेही त्यांनी सांगितले.विदर्भात यापूर्वी भाजपने ४२ जागा जिंकल्या होत्या. विदर्भात जिंकल्याशिवाय राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा.

हेही वाचा : सिंदीपार ग्रामस्थांनी केली राजकिय नेत्यांना गावबंदी

त्यामुळे महायुतीमध्ये उमेदवार कोणाचा हा किंतु-परंतु मनातून काढून टाका. महायुतीच्या उमेदवाराला भाजपचा समजा. कारण आपले लक्ष काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखण्याचे असल्याचे त्यांनी पुन्हा विषद केले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपने बूथवाईज नियोजन केले आहे. त्याची ए.बी.सी. अशी श्रेणी केली आहे. त्या सर्व बूथवर १० टक्के मते वाढवल्यास भाजपला कोणी पराभूत करू शकणार नाही,

हा कानमंत्र कार्यकत्यांना देतानाच लाभार्थ्यांच्या घरी, बूथ वैठकांना सुरुवात करा, आपल्यातील मतभेद दूर सारा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या, विजयादशमी ते दीपावली या दरम्यान, भाजपचा झेंडा हाती घेऊन रॅली काढा. महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीतील पराभूतांसोबत संपर्क करा, विरोधकांच्या बूथ कमेटी सदस्यांनाही आपल्याकडे वळवा, व्हॉटस अॅप ग्रुप स्थापन करा, अशा सूचना अमित शहा यांनी कार्यकत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे कार्यकत्यांमध्ये उत्साह वाढला आहे.

शंकाकुशंकांना पूर्णविराम

शहा यांनी या दौऱ्यात महायुती एकत्र लढणार की नाही? याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत महायुती एकत्र लढणार असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीला अजित पवारांमुळे भाजपचे नुकसान झाल्याचे निष्कर्ष काढला जात होता. भाजपच्या अनेक कार्यकत्यांनी विधानसभेची निवडणूक अजित पवार यांना सोबत घेऊन लढू नये, अशी जाहीर मागणी केली होती.

हेही वाचा : नाना जब भी बिखरा है, दुगनी रफ्तार से……..वाचा!

मध्यंतरी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीसुद्धा अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती. त्यामुळे महायुतीत मोठा विसंवाद असल्याचे दिसून येत होते. मध्यंतरी शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीसुद्धा अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती. त्यामुळे महायुतीत मोठा विसंवाद असल्याचे दिसून येत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीसुद्धा जाहीर कार्यक्रमांमधून महायुतीमधील कुठलाही घटकपक्ष दुखावणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना केली होती. असे असले तरी महायुती विशेषतः अजित पवार विधानसभेत एकत्रित लढेल की नाही याविषयी कार्यकत्यांच्या मनामध्ये शंका कायम होती. अमित शहा यांनी आम्ही सर्व एकत्रच लढणार असल्याचे जाहीर केल्याने आता शंकाकुशंकांना पूर्णविराम मिळाला आहे.

त्या’ पत्रकामुळे चर्चांना उधाण

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सामूहिक नेतृत्वामध्ये निवडणूक लढवणार का? या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चा सुरू होण्याला कारणीभूत ठरले आहे एक पत्रक, जे नागपुरातील केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या  कार्यकत्यांच्या संवाद बैठकीमध्ये कार्यकत्यांना वाटण्यात आले.

हेही वाचा : जन पळभर म्हणतील हाय हाय, कार्यकर्तेच नाही राहिले तर नेता करील काय ?

या पत्रकामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आपल्यासाठी एक नवीन परीक्षा असून यासाठी सर्व कार्यकत्यांनी जोमाने काम करायला हवे, असा संदेश देण्यात आला आहे. तर त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वव्यापी नेतृत्व आपल्याकडे आहेच, तसेच अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या मार्गदर्शनात आपल्याला पूर्ण क्षमतेने विधानसभा निवडणुकांचा सामना करायचा आहे, असा उल्लेख या पत्रकात करण्यात आलेला आहे.

एकच लक्ष्य विधानसभा निवडणूक जिंकणे

त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुका भाजप नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वात लढवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पत्रकात भाजपच्या कार्यकत्यांना आता आपले एकच लक्ष्य आहे ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक असे सांगण्यात आले आहे.

जोवर आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकत नाही, तोवर कोणीही थकणार नाही, थांबणार नाही आणि विश्रांतीही घेणार नाही. आता सर्वांचं एकच लक्ष्य आहे, ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, महाराष्ट्रात परीक्षेच्या काळात काही लोक आपल्याला चक्रव्यूहात अडकवू पाहत आहेत. मात्र, आपल्याला तो चक्रव्यूह भेदायचा आहे असा कानमंत्रही कार्यकत्यांना देण्यात आला आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article जनतेच्या मनातल्या ‘CM’ चा अस्तित्वासाठी संघर्ष !मुंडे, खडसेंनंतर आता ठाकरेही त्याच रांगेत ?
Next Article डॉ. सोमदत्त करंजेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account