चौफेर प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून जागावाटप आणि अन्य मुद्द्यांवर सर्वांच्याच चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.
या, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच तयारी केली जात आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी त्या अनुषंगाने घडामोडी होताना दिसत आहेत. सध्या भाजप, काँग्रेस, शिंदे गट व अजितदादा गटाने अप्रत्यक्षपणे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवातही केली आहे.
लोकसभेतील यशानंतर आता विधानसभा निवडणुकीतीही आम्हाला यश मिळेल, असा विश्वास महाविकास आघाडीला आहे तर लोकसभेतोल चूक पुन्हा होणार नाही, असे म्हणत महायुती विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे.
जनतेला आकर्षित करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र, असे असले तरी एका सर्व्हेनुसार महायुती सरकारची अक्षरशः झोप उडवली आहे. या सर्व्हेत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची थेट सत्ता येईल, असे म्हटले आहे.
लोकपोलच्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून
लोकपोलच्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून असे समोर आले आहे की, महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळू शकतात, तर त्यांची मते ३८-४१ टक्के असू शकतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडी पन्हा एकदा मसंडी मारेल, असे या सर्वेक्षणात बोलले जात आहे.
हेही वाचा : काँग्रेस खासदाराचा रील्ससाठी फवारा उडला नाही, म्हणून पुन्हा व्हिडिओ
यंदाच्या विधानसभेत महाविकास आघाडीला १४१-१५४ जागा मिळू शकतात तर त्यांची मते ४१ – ४४ टक्के असू शकतात असेही या सर्वेक्षणात म्हटल जाते. तसेच इतर जे काही पक्ष आहेत त्यांना पाच ते १८ जागा मिळू शकतात.पक्ष आहेत त्यांना पाच ते १८ जागा मिळू शकतात. महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
विदर्भात भाजपला मोठा फटका
उपमुख्यमंत्री फडणवीसांचे होमपीच असलेल्या विदर्भात भाजपला मोठा फटका बसू शकतो. विदर्भात विधानसभेच्या ६२ जागा आहेत. त्याठिकाणी महाविकास आघाडीला ४०-४५ जागांवर यश मिळेल तर महायुतीला अवघ्या १५ ते २० जागांवर समाधान मानावे लागेल.
उत्तर महाराष्ट्रात समसमान यश
उत्तर महाराष्ट्रात मात्र महविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीनाही समसमान यश मिळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात ४७ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी महाविकास आघाडीला २०-२५ आणि महायुतीलासुद्धा २०-२५ जागा जिंकता येतील.
हेही वाचा : …ते फर्मान सोडणारा तो ‘कटप्पा’ कोण?
कोकणात मात्र महाविकास आघाडीला मोठा फटका
ठाणे आणि कोकणात मात्र महाविकास आघाडीला मोठा फटका बसेल, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. या भागात विधानसभेच्या ३९ जागा आहेत. यात महाविकास आघाडीला अवघ्या ५ ते १० जागा जिंकता येतील तर महायुतीला २५-३० जागा मिळू शकतात. लोकसभेलासुद्धा याच झोनमध्ये महायुतीला दमदार यश मिळाले होते.
मुंबई व मुंबईमध्ये मात्र महाविकास आघाडीची सरशी
मुंबईमध्ये मात्र महाविकास आघाडीची सरशी पाहायला मिळेल. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. यामध्ये महाविकास आघाडीला २० ते २५ तर महायुतीला १० ते १५ जागा जिंकता येतील. उद्धव ठाकरेंच्या या वालेकिल्ल्यात ठाकरे गट आणि काँग्रेसची एकमेकांना साथ राहील. आणि निकालात हे स्पष्ट होईल, असे म्हटले जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रात एकूण ५८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी महाविकास आघाडीला ३० ते ३५ आणि महायुतीला २० ते २५ जागा मिळतील.

