उत्सव निवडणुकीचा अभिमान महाराष्ट्राचा माझा देश माझा अभिमान, येत्या निवडणुकीत साकोली विधानसभा मतदार क्षेत्रात शंभर टक्के मतदान व्हावे याकरिता लाखनी येथील पंचायत समिती कार्यालयात मतदान जणजागृती करण्यात आली. सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराचा कालावधी येत्या सोमवारी दि. 18 नोव्हेंबरला संपत असल्याने प्रत्येक पक्षाने प्रचारासाठी जोर लावला आहे.
उमेदवारही मतदारसंघात रॅली आणि मतदारांच्या गाठीभेटींनाही महत्व देत आहेत. दरम्यान, राज्यात मतदान मोठ्या प्रमाणात व्हाव याकरिता प्रशासनाकडून वेगवगेळ्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर (दि.16) नोव्हेंबरला लाखनीत प्रशासणाकडून जनजागृती करण्यात आली. येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,प्रशासनाने मतदार जनजागृतीसाठी ‘स्वीप’ अंतर्गत विविध उपक्रम राबविले आहेत.
62 साकोली विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शंभर टक्के मतदान व्हावे याकरिता तालुक्यातील “स्वीप” अंतर्गतच्या माध्यमाधून मतदारांना मतदान करण्यासाठी जणजागृती करण्यात आली.
सुभाष बावनकुळे
-नोडल अधिकारी, लाखनी