चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता दोन महिन्यांची गरोदर
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > क्राईम डायरी > लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता दोन महिन्यांची गरोदर
क्राईम डायरी

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता दोन महिन्यांची गरोदर

आरोपी नागपुरातून अटक; लाखनी पोलिसांची कारवाई

चौफेर वार्ता
Last updated: May 13, 2026 10:11 pm
चौफेर वार्ता
Share
File photo
SHARE

लाखनी : लग्नाचे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत नागपूर येथील आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर ‘पोक्सो’सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वंश दीपक हुमणे (वय २१, रा. लोकमान्यनगर, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

लाखनी तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय पीडित मुलीला आरोपीने लग्नाचे प्रलोभन दाखवले होते. दि. २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास गडेगाव परिसरातील एका कॅफेमध्ये आरोपीने पीडितेच्या संमतीविना तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनंतर पीडितेच्या प्रकृतीत बदल जाणवू लागल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सिद्धिविनायक हॉस्पिटल, लाखनी येथील वैद्यकीय अहवालात पीडिता दोन महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, हा प्रकार समोर येताच पीडितेच्या आईने लाखनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) सह पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीला नागपूर येथून ताब्यात घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्यासह पोलीस हवालदार अमितेश वडेटवार व पोलीस शिपाई प्रशांत धकाते करीत आहेत. आरोपी हा पीडितेचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article ‘भेल’ प्रकल्पाची १३ वी पुण्यतिथी?; १३ वर्षांनंतरही प्रकल्पग्रस्तांच्या हाताला काम मिळेना
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account