>>>> अनोखी बडघरे | भंडारा चौफेर
भंडारा | भंडाऱ्याचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतांमध्ये कारच्या बोनेटवर बसून रील बनवत फिरत असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.
या व्हिडिओत दिसते की, पडोळे दौऱ्यावर असताना त्यांच्या मार्गावरील रस्त्यावर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. ते पाहून पडोळेंची गाडी थांबते व खासदार स्वत: बोनेटवर बसून पुरातून जाणाऱ्या गाडीसह रील्स काढताना दिसले.’ एकीकडे पुरामुळे शेतकरी हैराण असताना खासदारांची ही स्टंटबाजी लाजिरवाणी असल्याची टीका विरोधकांनी केली. दरम्यान, खासदार पडोळे यांनी मात्र याविषयी बोलण्यास नकार दिला.
व्हिडिओत नेमके काय?
भंडाऱ्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी खासदार पडोळे हे आले होते. त्यावेळी त्यांनी गाडीच्या बॉनेटवर बसत, स्टंटबाजी केली आहे.
हेही वाचा : …ते फर्मान सोडणारा तो ‘कटप्पा’ कोण?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खासदार प्रशांत पडोळे हे एका गाडीमधून प्रवास करताना दिसत आहेत. असेही सांगितले जात आहे की, ते शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत होते. मात्र, यावेळी एका रस्त्यावरून जात असताना खासदार पडोळे यांनी त्यांच्या गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास केला असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हेही वाचा : विघ्नहर्त्या, पुर ग्रस्तांना भरीव मदत देण्याची शासनाला सद्बुद्धी देरे बाबा…
प्रशांत पडोळे हे प्रवास करत असलेल्या मार्गावरील रस्त्यावर एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसत आहे. रस्त्यावर पाणी साचलेले पाहून प्रशांत पडोळे यांची गाडी थांबताना दिसत आहे. त्यानंतर खासदार प्रशांत पडोळे हे गाडीच्या बोनेटवर बसलेले पाहायला मिळतात.
एवढंच नाही तर रस्त्यावरील साचलेल्या पाण्यातून त्यांची गाडी जात असताना ते बॉनेटवर बसलेले पाहायला मिळतात. गाडीच्या बोनेटवर बसून प्रवास केलेला व्हिडिओ त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काढल्याचंही दिसून येत आहे.

