लाखनी | येथील पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात मंडईनिमित्त आयोजित कार्यक्रमातून अल्पवयीन मुलीला घेऊन जात तिच्यावर शारीरिक संबंध केल्याची प्रस्थापित धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी युवकाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवकाचे नाव लालदास नरहरी गजभे (२५) रा. गोंडसावरी, ता. लाखनी असे आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गावंडे तपास करीत आहेत. मागील आठवड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती हे विशेष. या घटनेतील आरोपी युवकाने फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी हिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते. दरम्यान दि. २६ ऑक्टोबर च्या रात्री ११.४५ वाजता ते २७ ऑक्टोबर च्या पहाटे ०१.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गावामध्ये मंडईनिमित्त ‘हंगामा’ कार्यक्रम सुरू होता.
कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या पीडितेला आरोपीने तेथून गावाशेजारील शेतशिवारात नेले. तिथे त्याने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी लालदास गजभे याच्याविरुद्ध अपराध क्रमांक ४३४/२०२५, कलम ३७६ (१), भारतीय दंड संहिता सहकलम ४, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संगिता गांवडे करीत आहेत. अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या या घटनेमुळे लाखनी तालुक्यात खळबळ उडाली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलिस विभागाने अल्पवयीन मुलीच्या समुपदेशनासाठी उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.
लाखनी पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर युवकाचा अत्याचार
पोलिसांत गुन्हा दाखल

