चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: काँग्रेस-भाजपमध्ये ‘सामना एक, प्रतिष्ठा दोन आमदारांची’; राष्ट्रवादीने गणित बिघडवले?
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > चौफेर वार्ता > काँग्रेस-भाजपमध्ये ‘सामना एक, प्रतिष्ठा दोन आमदारांची’; राष्ट्रवादीने गणित बिघडवले?
चौफेर वार्ताराजकारण

काँग्रेस-भाजपमध्ये ‘सामना एक, प्रतिष्ठा दोन आमदारांची’; राष्ट्रवादीने गणित बिघडवले?

नाना पटोले, परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला

चौफेर वार्ता
Last updated: November 9, 2025 2:22 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर

भंडारा जिल्ह्यातील राजकारण आगामी नगर परिषद निवडणुकीमुळे ढवळून निघाले आहे. २ डिसेंबरला होऊ घातलेल्या या निवडणुकीत भंडारा, तुमसर, पवनी आणि साकोली या चार नगर परिषदांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभराने होत असलेली ही निवडणूक विद्यमान आमदारांसाठी एकप्रकारे ‘चाचणी परीक्षा’च ठरणार आहे. विशेषतः साकोली नगर परिषदेचा गड राखण्यासाठी काँग्रेसचे आमदार नाना पटोले आणि भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके या दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

आमदारांसाठी कसोटीचा काळ

या निवडणुकांच्या निकालातून आमदारांना मिळालेले यश, मताधिक्य आणि मतदारसंघावरील प्रभाव स्पष्ट होणार असल्याने, त्यांच्यासाठी हा ‘परीक्षेचा काळ’ आहे. तब्बल साडेतीन वर्षांच्या कालावधीनंतर नगर परिषद निवडणुका होत आहेत. २०१७ मध्ये साकोली नगर परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता होती, तेव्हा पटोले भाजपचे आमदार होते. आता ते काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, भाजपचा मानला जाणारा हा गड काँग्रेसच्या ताब्यात आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.साकोली नगर परिषद हा भाजपचा गड मानला जातो. त्यामुळे, हा गड अक्षुण्ण ठेवण्याचे मोठे आव्हान आमदार फुके यांच्यासमोर असणार आहे.

प्रफुल्ल पटेलांसाठी ‘प्रतिष्ठेची’ लढाई

या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीही लक्ष घातले आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी साकोलीत तळ ठोकला असून ते जोर लावत आहेत. या पार्श्वभूमीवर, साकोली नगर परिषदेवर आमदार नाना पटोले (काँग्रेस), आमदार परिणय फुके (भाजप) की सुनील फुंडे (राष्ट्रवादी काँग्रेस) यापैकी कोण बाजी मारणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात पक्षांत उड्या वाढल्या
Next Article युवासेना पदाधिकाऱ्याची थेट एकनाथ शिंदेंना पत्र पाठवून उमेदवारीची मागणी
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account