चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: एमडीएन शाळेचा अनागोंदी कारभार : पालकांमध्ये संताप
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > ताज्या बातम्या > एमडीएन शाळेचा अनागोंदी कारभार : पालकांमध्ये संताप
ताज्या बातम्या

एमडीएन शाळेचा अनागोंदी कारभार : पालकांमध्ये संताप

आमदार नाना पटोले यांना निवेदन

चौफेर वार्ता
Last updated: April 6, 2025 7:16 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>अतुल नागदेवे | लाखनी

खासगी शाळांच्या मनमानी कारभारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. वाढती फी, अनावश्यक खर्च आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे अनेक पालक हैराण झाले असून, शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.गेल्या काही वर्षांपासून खासगी शाळांमध्ये फीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. यंदाच्या शैक्षणिक वर्षात अनेक शाळांनी कोणतीही पूर्वसूचना न देता फीमध्ये १० ते १५ टक्क्यांनी वाढ केली आहे. याशिवाय, पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्यासाठी अवास्तव दर आकारले जात असल्याचे तक्रारी पालकांनी केले आहे.

लाखनी तालुक्यातील केसलवाडा येथील एम.डी.एन. फ्यूचर स्कूल या स्वयंअर्थसहाय्यित शाळेवर पालकांनी गंभीर आरोप केला असून, यासंदर्भात (दि.३) एप्रिल रोजी भंडारा येथे एक तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत शाळेच्या मुख्याध्यापक आणि संचालक मंडळावर शुल्क विनियमन कायद्याचे उल्लंघन, आर्थिक शोषण आणि पालक-शिक्षक संघटनेच्या नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

तक्रारकर्त्यांमध्ये शमीम शफी आकबानी आणि अक्षय चंद्रशेखर खेडीकर यांचा समावेश असून, त्यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद भंडारा, धर्मादाय आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच आमदार नाना पटोले यांच्याकडे (दि.५) एप्रिल रोजी निवेदन सादर केले आहे. शाळेने महाराष्ट्र शिक्षण संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११, २०१४, २०१६ आणि २०१८ च्या तरतुदींचे उल्लंघन करून शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी पालक-शिक्षक संघटनेच्या संमतीशिवाय मनमानी पद्धतीने शुल्क आकारणी केल्याचा आरोप आहे.

पात्रता नसलेले शिक्षक

शाळेमध्ये डीएड, बीएड अहर्ता नसलेल्या शिक्षकांद्वारे अध्यापन केले जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्यच धोक्यात येत आहे. असाही आरोप करण्यात आला आहे.

शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी सक्ती

शुल्कवाढीसोबतच या खासगी शाळेत पालकांना वह्या, पुस्तके, गणवेश, दप्तर व इतर शैक्षणिक साहित्य शाळेतूनच खरेदी करावे, अशी सक्ती पालकांना केली जात आहे. यासाठी पालकांकडून बाजारभावापेक्षा अवाजवी शुल्क घेतले जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची सुविधा देण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पालक-शिक्षक संघटनेच्या कार्यकारी समितीत अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती आणि इतर मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व देण्यात आले नसल्याचा आरोप आहे.तक्रारीत शाळेवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान नाना पटोले यांना याप्रकरणी निवेदन देण्यात आले असल्याचे सांगितले असता, ओळख नाही असे वक्तव्य प्राचार्य राजेश निनावे यांनी केले.

हे प्रकरण मला माहिती आहे. मात्र, माझेशी बोलणारे आपणास मी ओळखत नसल्यामुळे याबाबत माहिती किव्हा बोलू शकणार नाही. आपण शाळेच्या वेळेत कार्यालयात येऊन माझे म्हणणे ऐकून घ्यावे.

-राजेश निनावे
प्राचार्य एमडीएन फ्यूचर स्कुल यांनी केले

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article रोहयो योजनेअंतर्गत कुशल कामांवर ब्रेक; ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास रखडले
Next Article ‘इंग्लिश फॉर एव्हरीवन’ मोहिमेत उल्लेखनीय कामगिरीसाठी राज कलचुरी सन्मानित
जिल्हा दूध-संघ निवडणुकीत टाय ; सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच
चौफेर वार्ता राजकारण
शिवसेना-भाजप वाद विकोपाला; फुके-भोंडेकर आमनेसामने
चौफेर वार्ता राजकारण
Milk union election : नाना पटोले-नरेंद्र भोंडेकर यांचा एकत्रित लढा
राजकारण विदर्भ
जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व कायम     
राजकारण विदर्भ
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account