चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: अनैतिक संबंधातुन विधवेची निर्घृणपने हत्या; आरोपीचे पोलिसांत आत्मसमर्पण
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > ताज्या बातम्या > अनैतिक संबंधातुन विधवेची निर्घृणपने हत्या; आरोपीचे पोलिसांत आत्मसमर्पण
ताज्या बातम्या

अनैतिक संबंधातुन विधवेची निर्घृणपने हत्या; आरोपीचे पोलिसांत आत्मसमर्पण

लाखनी तालुक्यातील मोगरा येथील घटना

चौफेर वार्ता
Last updated: March 22, 2025 10:01 am
चौफेर वार्ता
Share
SHARE

भंडारा चौफेर | लाखनी

अनैतिक संबंधातून गावातीलच तरुणाने विधवा महिलेचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केल्याची घटना लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मोगरा/शिवणी येथे (दि.२१) मार्च रोजी दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. पुष्पा रामेश्र्वर बनकर (वय ३७ वर्षे,रा. मोगरा/शिवणी, ता. लाखनी) असे मृतक महिलेचे नाव असून,खुशाल पुरुषोत्तम पडोळे (वय २७ वर्षे, रा.मोगरा, त. लाखनी) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

या घटनेतील मृतक व आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. मृतक पुष्पा बनकर ही भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपल्या २ मुलांचा सांभाळ करीत होती.गत काही वर्षापूर्वी तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान,शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपी खुशाल पडोळे याने तिला शेतशिवारातील नाल्याकडे बोलावले आणि नंतर आरोपीने रस्सीने गळा आवळून तिचा निर्घृणपने खून केला.

मृतक पुष्पा व आरोपीचे मागील अडीच वर्षापासुन अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. मोगरा येथील नाल्याजवळ मृतक महिलेचे शेत आहे.शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे.घटनेच्या दिवशी मृतक महिला ही शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेली होती.थोड्या वेळाने आरोपी तिथे गेला.यादरम्यान दोघात वाद झाला.यावादातून आरोपीने मृतकाच्या शेतालागत असलेल्या सागवनाच्या वाडीत दोरीने गळा आवळून विधवेचा निर्घृणपणे खून केला.


यानंतर आरोपीने लाखनी पोलिस ठाणे गाठले व हत्येची कबुली दिली.लगेच पोलिस घटनस्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद चव्हान,पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव व लाखनी पोलिस ठाण्याची चमू घटनास्थळी दाखल झाली होती. प्रकरण गंभीर असल्याने फॉरेन्सिक चमूला पाचरण करण्यात आले होते.वृत्त लिहीपर्यंत लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article टमाटरची ‘लाली’ उतरली; दर घटल्याने शेतकरी हवालदिल
Next Article नोकरीचा आमिष दाखवून ५ लाखांची फसवणूक; लाखनी शहरातील प्रकार
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account