भंडारा : जिल्ह्यातील 7 पंचायत कालावधीसाठी सोमवारी (दि.20) सभापती, उपसभापतीकरिता निवडणूक प्रक्रिया पार पडली. भंडारा, तुमसर आणि लाखनी तीन ठिकाणी सभापतीपदी महिला आरूढ झाल्या. तर उर्वरित 4 पसंत पुरूषांची सभापतीपदी वर्णी लागली आहे. तुमसर, मोहाडीत (राष्ट्रवादी अजित), भंडारा, लाखांदूर (भाजप) अशा चार पंसत महायुतीची सत्ता बसली असून पवनी, साकोली, लाखनी पसंत काँग्रेसने गड राखला आहे. तुमसर, मोहाडीत चुरशीच्या लढतीत आ. राजू कारेमोरे यांनी माजी आ. वाघमारे यांच्या गटावर सरशी साधली.
या निकालाकडे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये महायुतिचे वर्चस्व दिसून आले.
विधानपरिषदेचे आमदार डाँ. परिणय फुके व विद्यमान आमदार राजु कारेमोरे यांच्या नेतृत्वात भाजपचे तीन सभापती व तीन उपसभापती निवडून आले. राष्ट्रवादीचे एक सभापती व दोन उपसभापती निवडून आले. अशा प्रकारे महायुतीचे चार सभापती व पाच उपसभापती निवडून आले.
भंडारा पंचायत समितीत भाजपच्या कल्पना कुरझेकर, मोहाडी पंचायत समितीत जगदीश शेंडे तर लाखांदूर पंचायत समितीत पुरुषोत्तम ठाकरे यांची निवड झाली. राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे तुमसर पंचायत समितीत दीपा गौपाले सभापती म्हणून निवडून आल्या.
तुमसर पंचायत समितीत भाजपचे सुभाष बोरकर, मोहाडी पं. स मध्ये देवा चकोले, पवनी पं. समितीत प्रमोद शेंडे यांची उप सभापती पदी वर्णी लागली. राष्ट्रवादीचे नागेश भगत हे भंडारा पंचायत समिती मध्ये उपसभापती पदी व सुश्मिता वरखडे लाखांदूर पंचायत समिती उपसभापती म्हणून निवडून आल्या.
जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व कायम
सभापती व उपसभापती निवडणूकीचा निकाल जाहीर
