>>>>भंडारा चौफेर : शमीम आकबानी
विधानसभेचे बिगुल वाजले येत्या 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्यात राज्यात मतदान होणार असून, आता शेतकरी हीच एकमेव जात न्याय मिळवायचा असेल तर जातीपातीला मूठमाती द्यायची आणि हक्कासाठी एकत्र येऊन लढायचे. शेतरकरी, शेतमजूर यांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे सरपंच संघटना जिल्हा अध्यक्ष शरद इटवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, साकोली विधानसभा मतदार संघात अपक्ष लढण्यास इच्छुक असल्याची माहिती दिली. शिवाय, त्या दिशेने वाटचालही सुरू केली.
भंडारा जिल्हा हा धान उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतू साध्या भोळ्या धान उत्पादक शेतकरी बांधवांना मृग जळा सारखे मुंगेरीलालचे हसीन स्वप्न दाखवून सत्ताधाऱ्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांचा फक्त राजकारणासाठी वापर केला असल्याचे दिसून येत आहे.
कोणताही मोठा राजकीय पक्ष असाे, ते शेतकऱ्यांचे शत्रूच आहेत. त्यामुळे शेतकरी हीच एकमेव जात समजून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना बळ देणारा समर्थ राजकीय पर्याय देण्याचा निर्णय (दी.20) ऑक्टोबर रोजी रविवारी माध्यमवर्गांना दिली.यात होणाऱ्या विधानसभा निवडणूक अपक्ष लढवण्याचा शरद इटवले यांचेकडून निर्णय घेण्यात आला.
2020 साली भंडारा जिल्हा दूध संघाची स्थिती बंद पडण्याच्या अवस्थेत असताना जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थेच्या प्रतिनिधिची नेमणूक करून संघटना उभी केली. दरम्यान, संघटनेच्या माध्यमातून पुन्हा सुरळीत करण्याचे काम इटवले यांनी केले. त्यामाध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा काम केला.त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून दूध उत्पादक यांची पिळवणूक थांबवण्यात आली.
सरपंच संघटनेच्या माध्यमातून सरपंच व गावात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संघटना चांगले काम करीत असून, या संघटनेने जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. मागील दीडवर्षांपासून संघटनेच्या वतीने विविध प्रश्नाना मार्गी लावण्याचे काम केले. हे सर्व संघटनेच्या माध्यमातून शक्य झाले.
सत्ताधाऱ्यांनी धान उत्पादक शेतकरी बांधवांच्या धान पिकाला खर्चावर आधारित हमी भाव जाहीर करून प्रती क्विंटल पाच हजार रुपये भाव देणे, शेतीची सर्व कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करणे, रासायनिक खतांच्या किंमती कमी करणे अपेक्षित होते.मात्र त्याकडे कुणाचेच लक्ष नाही.
शेतकरी बांधवांना बळीराजा म्हटल्या जाते. परंतू सत्ताधारी बळीराजाला भूलथापा देऊन बळीचा बकरा बनवत असल्याने शेतकऱ्यांची मानसिकता ढासळली आहे. यास सत्ताधाऱ्यांचे उपेक्षित धोरण कारणीभूत आहे.असल्याचे शरद इटवले यांनी सांगितले. त्यामुळे जगाचा पोशिंदा बळीराजा याला न्याय मिळवून देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुक अपक्ष लढण्याचा निर्धार इटवले यांनी यावेळी व्यक्त केला.