>>>>चौफेर संपादकीय लेख | संदीप नंदनवार
भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये व विकारापर्वात स्व. मनोहरभाई पटेल व खा. प्रफुल्ल पटेल यांचे योगदान कोणीही विसरू शकत नाही. पण हे विकासपर्व गतिमान ठेवण्यात व जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यात भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष मा. सुनीलभाऊ फुंडे यांनीही प्रचंड मेहनत घेतली आहे. वडील डॉ. बाबुरावजी फुंडे (बावाजी) यांचे परममित्र पालांदूरचे स्व. मुरलीधर नंदनवार (सावकार साहेब) यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून सुनीलभाऊंनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली व आज त्यांनी स्वतः चा एक स्वतंत्र ‘सा ही भंडारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उमटविला आहे.
हेही वाचा : भंडाऱ्यात 51 फूट उंचीच्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे लोकार्पण
भाऊंची एक स्वतंत्र शैली व कामाचा प्रचंड उरक यामुळे एक युथ आयकॉन म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. भाऊंची भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदी निवड झाली. ती त्यांची कार्यशैली, प्रशासनावरील पकड व त्यांचे नेतृत्व गुण यामुळेच.. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यानंतर आदरणीय भाऊने विस्कटलेली बँकेची घड़ी बसविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. आज भाऊंच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात बँक नावारुपास आली आहे.
हेही वाचा : पडघम विधानसभेचे : मुलाखतीनंतर आता उमेदवारीची उत्सुकता
सामाजिक जीवनात जगत असताना आपणास मिळणारी माणसे ही समाजातील सर्व सामान्य माणसांचे आदर्श झालेली आपण पाहिली. किंबहुना त्यांना सर्वसामान्यांनी आपले गुरू माणले हे देखील आपल्या निदर्शनास आलेले आहे. परंतु समाजात जन्म घेतल्यावर समाजात आपली पाने-मुळे सामान्य माणसात रूजवणे प्रत्येकाचे काम नाही. त्यात काही अपवाद होतात आणि समाज त्यांना आपला आधार माणतो. त्यातच काही माणसे एक पाऊल पुढे निघतात. असाच एक सामान्य माणूस जिल्ह्याच्या जन्मभुमीत जन्मास आला.
वडील व्यवसायाने वैद्यकीय अधिकारी पण सर्व सामान्यांचे ‘ डॉक्टर बावाजी’ म्हणून प्रसिध्द व्यक्तीत्व अशा प्रसिध्द पण सामान्य कुटूंबात एक बालक जन्मास आला. तारीख होती १९ ऑक्टोंबर १९६६ जन्मास येणार्या बालकाचे नाव ठेवले सुनील. वडील डॉ. बाबुराव तुमाजी फुंडे व आई इंदुबाई बाबुराव फुंडे यांच्या प्रेमळ संसारातील सुनील म्हणजे धाकटे मुलं. आईच्या विशेष प्रेमाणे सुनील मोठा होऊ लागला.
हेही वाचा : पडघम विधानसभेचे : आता ‘डीएमके’च्या मतांसाठी भाजप नेमणार बूथनिहाय पालक
सुनीलचा जन्म सरकारी दवाखान्यात झाल्याने आणि वडील स्वत: डॉक्टर असल्यामुळे जन्मापासूनच माझा डॉक्टरी पेशा पुढे सुनील चालवेल अशी अपेक्षा वडिलांची होती. पुढे सुनीलचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले ते पिंपळगावच्या जिल्हा परिषद शाळेत. पुढे सुनील वर्ग ५ ते १२ वी पर्यंत समर्थ विद्यालय लाखनी येथे शिक्षण घेवून समोरचे शिक्षण घेण्यास उमरेडला गेला.
अभ्यासात हुशार असलेला सुनील पुढे सिव्हील इंजिनिअर झाला. आपला अभ्यास आटोपून सुनील गावात परतला. पुढे काय करावे या विषयाने सुनीलला पछाडले. आणि समोरच्या जिवनाचे उद्दीष्ट काय हे समजताना सुनील त्रस्त झाला. म्हणतात ना मुलं मो’े झाले की, आई – वडील मुलांना स्वत:च्या पायावर उभे व्हा असे सांगण्याची वेळ सामन्य कुटूंबात निर्माण होते. तशी गरज फुंडे कुटूंबात पण निर्माण झाली.
सुनील त्यातच ठेकेदारी व्यवसाय करायचा म्हणून फॉरेस्ट ठेकेदारी तसेच सिव्हील ठेकेदारी करू लागला. आपले स्वत:चे स्थान निर्माण करायचे हेच उद्दीष्ट सुनीलच्या जीवनात प्रथम स्थानावर होते. ठेकेदारी चालू होती, जीवन समोर चालू होते त्याकाळी पिंपळगावच्या फुंडे कुटुंबियांचे पालांदूरातील नंदनवार परिवाराशी घनिष्ठ व कौटुंबिक संबंध होते. अशातच दुग्ध उत्पादक संघाची निवडणूक आली.
हेही वाचा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा
विशेष म्हणजे, त्यावेळचे दुग्ध सम्राट स्व. यादोरावजी पड़ोळे यांनी मुरमाडी क्षेत्रातून दुग्ध उत्पादक संघाची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवार हवा म्हणून पालांदूरच्या शे’जी म्हणून प्रसिध्द असणार्या कापड व्यवसायी स्व. दामोधर नंदनवार यांच्या कानावर टाकली. शे’जींनी क्षणाचाही विचार न करता लहान भावाप्रमाणे असणार्या सुनीलचे नाव पडोळेंना सुचविले व नावावर शिक्कामोर्तबही करण्यात आले.
दुग्ध उत्पादक संघाची निवडणूक लढविण्याची सुनीलला संधी मिळाली व संधीचे सोने झाले. यावेळी सुनीलचे वय होते फक्त २६ वर्ष वयाचे बंधन आड येतात ते जीवनाचे उद्दीष्ट नसलेल्या माणसाचंपुढे, पण ज्यांनी जीवनाचे साफल्य सामान्यांच्या कामांसाठी अर्पण केले आहे त्यांचे घोडे कुठेअडत नाही. दुग्ध संघाची निवडणूक लढवणे हे सुनीलला त्याचे समोरचे जीवन बदलवणारे ठरले.
दुग्ध संघाची निवडणूक सुनीलने लढवली आणि जिंकली पण. आता सुनील, सुनीलभाऊ म्हणून समाजात समोर आला. दुग्ध संघात भाऊला त्यांच्या जीवनाचे स्थान बळकट करण्यासाठी भेटले ते स्व. यादवराव पडोळे जे पुढे सुनीलभाऊचे राजकीय गुरू झाले.
हेही वाचा : कुठे नेऊन ठेवला नेत्यांनी भाजप ?
आपल्या गुरूच्या म्हणजेच स्व. यादवराव पडोळे यांच्या सानिध्यात सुनीलभाऊ घडले. हळूहळू दुग्ध संघाच्या विकासात सुनीलभाऊ कर्ते पुरूष म्हणून समोर आले. स्व. यादोराव पडोळे यांचा संपर्क दांडगा होता. ते स्वत: सक्षम नेतृत्व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मर्जीतले नेते होते. स्व. यादवराप पडोळे यांनी सुनीलभाऊंची संघामध्ये क्षमता, चातुर्य ओळखले. तसेच आपला राजकीय वारसा
सुनीलभाऊ सक्षमतेने चालवू शकेल असा प्रचंड विश्वास ठेवुन स्व. यादवराव पडोळे यांनी सुनीलभाऊला काँग्रेस पक्षात ओढले. आणि सुनीलभाऊ खा. प्रफुल्ल पटेल यांच्या सानीध्यात आले. तिथून सुनीलभाऊच्या खर्या राजकीय जीवनाची पायाभरणी झाली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. हा राजकीय प्रवास पुढे वाढत गेला तो सामान्य शेतकर्यांच्या सानीध्यात.
आपला जिल्हा हा खर्या अर्थाने शेतकर्यांचा जिल्हा आहे हे ओळखून त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणले पाहिजे.
या आपल्या जीवनमुल्याने सुनीलभाऊंच्या मनात शेतकर्यांप्रती उमाळा दाटून आला. आपल्या जिल्ह्याचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी भंडारा डिस्ट्रीक सेंट्रल को.ऑप. बँक मध्ये प्रवेश केला. आपल्या संपुर्ण सामाजिक बांधीलकीने भाऊ बँकेचे अध्यक्ष झाले. आज जिल्ह्यात शेतकर्यांची बँक म्हणून बीडीसीसी बँक नावारूपास आहे ती भाऊंच्या अथक परिश्रमाने. हक्काची बँक म्हणून शेतकर्यांना कर्जा पुरवठा करून बँकेचे नेतृत्व भाऊ सलग १६ वर्ष अध्यक्षपद भुषवीत आहेत. आपल्या जिवनात शेतकर्यांची सेवा बँकेच्या रूपात करणार्या भाऊंचा आज वाढदिवस.
आपल्या जिवनात सक्षम नेतृत्व आणि विश्वासाला जपणारे भाऊ आपल्या राजकीय जीवनाचे गुरू स्व. यादवराव पडोळे तसेच खा. प्रफुल्लभाई पटेल यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभे आहेत. खा. पटेल जिल्ह्याचे सर्वेसर्वा असून भंडार्यात सुनीलभाऊ आधारस्तंभ आहेत. सामान्यांचा सुनील आता सर्वसामान्यांचा सुनीलभाऊ झाला आहे. भाऊंना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रशासनावर भक्कम पकड
गेल्या काही वर्षात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळत भाऊंनी आपल्या कामाचा ‘सा उमटविलेला आहे. सामर्थ्यशाली जिल्ह्यासाठी ते अहोरात्र झटतात. प्रचंड उत्साहने शेतकर्यांचे व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे जनतेच्या सुख दुःखामध्ये साथ देणारे ते ‘खरेखुरे भाऊ’ आहेत. त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात नेहमी आदर व विश्वास राहिला आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करीत असताना त्यांनी प्रशासनात कमालीची गतिमानता आणली आहे. परंतु त्या माध्यमातून जनता जनार्दनाची कामे करताना प्रशासनावर त्यांनी मो’ा दरारा ‘ेवला आहे. अगदी भरसभेतही कुणाचेही काम असो, अधिकार्याला सर्वांसमोर फोन करून तिथल्या तिथे कामाचा निपटारा करण्याची भाऊंची पद्धत अजून कुणालाही जमली नाही. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर अन् बँकेच्या माध्यमातून भाऊंनी घेतलेले धडाकेबाज निर्णय आजही लोकांच्या स्मरणात आहेत.
करायचे ते उत्तमच हाच ध्यास
आज आपण पाहतो की, अनेक लोकप्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघाचाही चांगला विकास करता येऊ शकला नाही. अनेकांना तर आपले मूळ गावही सुधारता आलेले नाही. अनेक जण निवडून गेल्यानंतर पुन्हा पुढच्या निवडणुकीच्या वेळीच जनतेच्या समोर येतात. त्यामुळे त्यांना निवडून येण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.
याउलट राष्ट्रवादीचे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या विकासाभिमुख व लोकोपयोगी विकासकामांचा उद्देश सफल करण्यासाठी सुनीलभाऊ आजही जिल्ह्यात राबत आहेत. हाच एकमेव माणूस आपले काम करू शकती, इतका प्रचंड विश्वास लोकांमध्ये आहे. विकासाचा ध्यास हेच या पाठीमागचे खरे गुपीत आहे.