चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: गडेगाव येथून राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरूवात
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > ताज्या बातम्या > गडेगाव येथून राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरूवात
ताज्या बातम्या

गडेगाव येथून राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला सुरूवात

चौफेर वार्ता
Last updated: September 29, 2024 5:14 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>>>>भंडारा चौफेर | श्यामसुंदर उके

साकोली विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या व त्याविषयीची जनजागृती व्हावी या उद्देशाने जि.प.सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांच्या नेतृत्वात २८ सप्टेंबर पासून परिवर्तन यात्रेला लाखनी तालुक्यातील गडेगाव येथुन सुरूवात झाली आहे.साकोली विधानसभा क्षेत्रात मातब्बर उमेदवारांनी क्षेत्राचे नेतृत्व केले. परंतु साकोली विधानसभा क्षेत्राचा पाहिजे तसा विकास झाला नाही.उद्योगधंदे, सिंचनाच्या सुविधा,वैद्यकीय सोयी,कृषी विकासाचे धोरण याबाबतीत विधानसभा मागासलेलीच राहिलेली आहे.
         
वैद्यकीय क्षेत्राच्या विकासात फक्त इमारती उभ्या दिसतात.परंतु अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नाहीत.महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणांविषयी कोणताही लोकप्रतिनिधी आमदार वा खासदार व अन्य पुढारी देखील यांनी प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.लाखनी येथे ग्रामीण रुग्णालय केवळ नावाचे आहे. तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत.पेशंटला नेहमीच लाखनी टू भंडारा किंवा नागपूर असा रेफर केले जातो.

या सर्व बाबींविषयी जनसामान्यात जाणीव व्हावी, क्षेत्राचा मागासलेपणा नागरिकांच्या लक्षात यावा, राजकीय पुढाऱ्यांना नागरिकांनी विकास कामांविषयी जाब विचारावे व तो त्यांचा अधिकार देखील आहे. आपले हक्क व अधिकारांची नागरिकांमध्ये जाणीव व्हावी या उद्देशाने जि.प.सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांच्या नेतृत्वात परिवर्तन यात्रेला दिनांक २८ सप्टेंबरपासून गडेगाव येथुन सुरुवात झाली आहे.

यावेळी नागेश वाघाये, धनु व्यास, नरेश इलमकर, उमराव आठोडे, जितेंद्र बोंद्रे, अर्चना ढेंगे, माया अंबुले, प्रतिक्षा गोस्वामी, मनोहर खराबे, अनिल मेश्राम, रमेश रामटेके, राजू मेश्राम, भारती गायधने, विक्की परमार, रोहित साखरे, चेतन बांडेबुचे, मेघराज शेळके, टेकराम तलवारे आदी मान्यवरव बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article साकोली विधानसभा : भाजपा फ्रंटफुटवर तर काँग्रेस बॅकफुटवर?
Next Article उपमुख्यमंत्र्यांच्या जनसन्मान यात्रेत गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकाऱ्याची पडद्यामागुन दबंगगिरी.?
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account