आज २७ सप्टेंबर , डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांचे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय कार्य सन्मानाने गौरवावे, असे वाटते. वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विदर्भातील भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात अमूल्य योगदान दिले आहे. मागील ३३ वर्षांपासून विविध शैक्षणिक संस्थांचे यशस्वी संचालन करत त्यांनी ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी दिली आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली स्वामी विवेकानंद सार्थ जन्मशती समारोह समितीमार्फत ५१ हजार युवकांचा सहभाग असलेले सूर्यनमस्कार महायज्ञ, तर २२ हजार युवकांचा सहभाग असलेली युवा संमेलने आयोजित करण्यात आली, ज्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड उर्जा निर्माण झाली. मोफत आरोग्य शिबिरांच्या आयोजनातून हजारो नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी त्यांनी केलेल्या योगदानामुळे समाजातील दुर्बल घटकांसाठी एक आदर्श कार्याचा ठसा उमटवला आहे.
डॉ. करंजेकर यांनी सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य अतुलनीय आहे. ३६०० मंदिरांमध्ये प्रभू श्रीरामांच्या प्रतिमांचे वितरण, ५०० बुद्ध विहारांमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमांचे वितरण, तसेच २४० भजन मंडळांचा सहभाग असलेल्या भव्य भजन स्पर्धांचे आयोजन करून त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात योगदान दिले आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातील झाडीपट्टी साहित्य संमेलने, कलावंत मेळावे व सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन, तसेच स्थानिक कलाकारांना आर्थिक सहकार्य हे त्यांच्या कलाविषयक संवेदनशीलतेचे उदाहरण आहे.
डॉ. सोमदत्त करंजेकर यांचे सर्वसमावेशक नेतृत्व, संघटनात्मक कौशल्य आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी यामुळे साकोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची दिशा निश्चितच ठरवली जाईल. त्यांचे कार्य समाजासाठी एक प्रेरणादायी ठरले आहे. साकोली विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी निश्चितच प्रगतीशील विचारांची एक नवी दिशा ठरेल.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भावपूर्ण शुभेच्छा देत, त्यांच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करतो. समाजाच्या सेवेसाठी त्यांचे यशवंत मार्गक्रमण अखंड राहो, त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चौफेर टीम कडून खूप खूप शुभेच्छा…!

