>>>>>अतुल नागदेवे | भंडारा चौफेर
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील ,सिंदीपार येथील ग्रामस्थांनी खराब रस्त्याच्या कारणावरून राजकिय नेत्यांना गावबंदी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. गुरुवार (दि. २६) राजकिय नेत्यांविरोधात बहिष्काराचे हत्यार उपसत गावाच्या वेशीवर तसा बॅनर लावत नेत्यांचा निषेध केला आहे. जर चुकीने देखील कुठलाही राजकीय नेता गावात फिरकला तर त्याच्या गाडीच्या काचा फोडणार असल्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे.
हेही वाचा : नाना जब भी बिखरा है, दुगनी रफ्तार से……..वाचा!
लाखनी तालुक्यातील सिंदीपार गावला जाण्यासाठी दोन किलोमीटर रस्ता अक्षरशः फुटलेला आहे.याच रस्त्यावरून गावकरी, शाळकरी मुले, गरोदर महिला, रूग्ण व नागरिकांना ये-जा करावी लागते. मात्र, हा मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच कळत नाही.
हेही वाचा : जन पळभर म्हणतील हाय हाय, कार्यकर्तेच नाही राहिले तर नेता करील काय ?
या खड्डेमय रस्त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अनेकदा अपघात झालेले आहेत. या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांना निवेदन देऊन देखील अजूनही गावाला पक्का रस्ता नसल्याने आता येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संपूर्ण गावकऱ्यांनी घेतला आहे. कोणत्याही पक्षाच्या राजकीय पुढार्यांना गावात फिरकू देणार नाही असे बॅनरच गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर लावलेला आहे. तर शाळकरी मुले देखील आपल्या आई वडिलांना मतदान करायला जाऊ नका अशा सल्ला देत आहेत.
हेही वाचा : सध्याच्या राजकारणात विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर… अन सच्चे कार्यकर्ते उष्ट्या वाटीवर
दरम्यान, गावाच्या वेशीवर लावलेल्या बॅनरमुळे चुकीनेही कुठलाही राजकीय नेता गावामध्ये फिरकला तर त्याच्या गाडीच्या काचा फोडण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. दुसरीकडे प्रत्येक निवडणुकीत राजकीय पुढारी गावात येऊन मोठ्या मोठ्या बतावण्या करतात. पण गावकऱ्यांचा रस्त्या संदर्भाच प्रश्न अजूनही सुटलेला नाही.
काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या गावात आले असताना गावकऱ्यांनी त्यांच्या समोर देखील रस्त्याचा पाढा वाचला होता व येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार करणार असल्याचेही पटोले यांच्याच समोर गावकऱ्यांनी म्हटले होते. तरीदेखील आ. पटोले यांनी गावाला पक्का रस्ता दिला नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आमदार खासदार यांच्याविरुद्ध नारेबाजी करत राजकिय नेत्यांना गावबंदी केली आहे.
हेही वाचा : भावी आमदार ! साकोली मतदारसंघात आता ‘या’ जि. प. सदस्याचे झळकले बॅनर
विशेष म्हणजे, एकीकडे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे स्वप्न पाहत असलेले विद्यमान आमदार नाना पटोले यांच्याच साकोली मतदारसंघात आता नागरिकांनी राजकिय नेत्यांना गावबंदी करुन मतदानावर बहिष्कर करण्याचे हत्यार उपसलेले आहे. त्यामुळे आपल्याच मतदारसंघातील जनतेला नाना पटोले कसे समोर जातात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी गावचे सरपंच सतीश बिसेन, जयश्री बडोले, ललित येळे, प्यारेलाल येळेकर, विद्यार्थिनी नयना कावळे, श्रावणी बिसेन व गावकरी उपस्थित होते.
आंदोलनाचा राजकीय नेत्यांवर काय होणार परिणाम अखेर गावातील शेतकऱ्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात राजकीय नेत्यांना व लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश बंदी केली आहे. जोपर्यंत आमच्या पक्का रस्ता करून मिळणार नाही, तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला व लोकप्रतिनिधीला गावात प्रवेश देणार नसल्याचा निर्णय गावकऱ्यांनी सामूहिकरित्या घेतला आहे. तसे पोस्टरही गावाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहे.
राजकीय लोकांना निवडणूक आल्या की मतदार आठवतो. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी येणाऱ्या राजकीय नेत्यांची गावबंदीमुळे चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सिंदीपार वासीयांच्या या आंदोलनाचा राजकीय नेत्यांवर काय परिणाम होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

