चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: माजी नगराध्यक्षाच्या बनावट साक्षऱ्या करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > ताज्या बातम्या > माजी नगराध्यक्षाच्या बनावट साक्षऱ्या करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!
ताज्या बातम्या

माजी नगराध्यक्षाच्या बनावट साक्षऱ्या करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!

प्रकरण तत्कालीन मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांच्या तक्रारीच्या चौकशीचे

चौफेर वार्ता
Last updated: September 21, 2024 7:53 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

>>>>> अनोखी बडघरे | भंडारा चौफेर

भंडारा | तुमसर येथील नगर परिषदेच्या काही माजी नगराध्यक्षाच्या नावांच्या बनावट साक्षऱ्या करुन तत्कालीन मुख्यधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांची जिल्हाधिकारी भंडारा यांना तक्रार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहें. तुमसरचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांची राज्य शासनाने २ सप्टेंबर २०२४ ला बदली केली. मात्र, त्यांच्या विरुध्द झालेल्या संपुर्ण तक्रारीची चौकशी झाली किंवा प्रलंबीत आहे.

या विषयी शुक्रवारी (दि. २०) जिल्हाधिकारी भंडारा यांना तुमसरातील माजी नगराध्यक्षांच्या नावांची स्वाक्षऱी करून एक तक्रार करण्यात आली. विशेष म्हणजे या तक्रार अर्जावर माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, अमर रगडे, जगदीश कारेमोरे, विजयकुमार डेकाटे, अरविंद कारेमोरे, गीता कोंडेवार, अभिषेक कारेमोरे या माजी नगरध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यासंबंधात माजी नगराध्यक्षांना विचारणा केली असता सदर तक्रार अर्जावर आपण स्वाक्षऱ्या केल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सदर तक्रार बनावट स्वाक्षरीने कुणी केली ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्षांची बनावट स्वाक्षरी करून तक्रार अर्ज देऊन जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांची चौकशी केली जाणार का ? यावर जिल्हाधिकारी संबंधितावर काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहें.

चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश
बनावट साक्षऱ्या केलेल्या तक्रारीवर जिल्हा सह आयुक्त नगर पालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांनी मुख्यधिकारी, न. प. तुमसर यांना त्या निवेदनातील मुद्दा क्र. १ ते ११ वर सखोल चौकशी करून तसा अनुपालन अहवाल या कार्यालयास न चूकता सादर करावा असे पत्राद्वारे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहें.

त्या आदेशाची प्रतिलिपी माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळेसह व इतर ६ माजी नगराध्यक्ष तुमसर शहर यांना दिली आहें. सदर तक्रार २० सप्टेंबर रोजी करण्यात आली व त्याच दिवशी तक्रारीची दखल घेऊन जिल्हा सह आयुक्त नगर पालिका यांचा तातडीने पत्र नगर परिषद मुख्याधिकारी यांना पत्र प्राप्त झाले . या प्रकरणी जिल्हा सह आयुक्त नगर पालिका प्रशासन करणकुमार चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

तक्रारदारांची खात्री होणार काय?

एखाद्याप्रकरणात तक्रारदाराने स्वत: तक्रार केल्याचे मान्य केल्यास अशा तक्रारीवर कार्यवाही करताना तक्रार अर्जातील अर्जदाराचे नाव पत्ता, याची खात्री करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठविण्यात यावी,खात्री झाल्यास पुढील कार्यवाही करावी,असे राज्य शासनाचे परिपत्रकात नमूद आहे.

शुक्रवारी मी एका कार्यक्रमात होती मी कोणतीही तक्रार अर्ज किंवा कोणत्याही कागदावर माझी स्वाक्षरी केली नाही.मी नगर पालिकेत यापूर्वी नगराध्यक्ष पद भुषविले आहे.त्यामुळे माझ्या स्वाक्षरीचे अनेक नमुने नगर पालिकेतील दस्ताऐवजावर बघावयास मिळतील त्याची पडताळणी करण्यात यावी.व दोषींवर कारवाई करण्यात यावी.

गीता कोंडेवार
माजी नगराध्यक्ष न.प. तुमसर

मॅट मधील प्रकरण परत घ्यावे याकरिता मुख्याधिकारी यांच्या संगनमताने माझ्या खोट्या व बनावटी तक्रारी करण्याचा व त्या तक्रारी समाज माध्यमावर प्रसिद्ध करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न स्थानिक काही माजी पदाधिकारी करत आहेत. व मी प्रामाणिकपणे शासन नियमाप्रमाणे कार्यवाही केली आहे.माझा अहवाल मागितला जाईल तेव्हा मी सर्व सादर करेल.

-सिद्धार्थ मेश्राम
तत्कालीन मुख्यधिकारी नगर परिषद तुमसर

जिल्हाधिकारी कार्यालया कडुन आमच्या कार्यालयाला २० सप्टेंबर रोजी ई-मेल प्राप्त झाला.व जिल्हा सह आयुक्त नगर पालिका प्रशासन कडु़न पत्र प्राप्त झाला आहे.त्या नुसार संबधीत विभागाना अहवाल मागितला आहे.अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल.व सदर तक्रारीवर कुणाची स्वाक्षरी होती नव्हती त्या विषयी मला काही माहिती नाही.

-करिश्मा वैद्य,
प्रभारी मुख्यधिकारी, नगर परिषद तुमसर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article विदर्भात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता ?
Next Article आमचे ठरले!भंडारा पवनी विधानसभा आता आमची : माजी खा.मधुकर कुकडे
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account