चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: रामटेक विधानसभेवर मशालच पेटणार: किशोरी पेडणेकर
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > ताज्या बातम्या > रामटेक विधानसभेवर मशालच पेटणार: किशोरी पेडणेकर
ताज्या बातम्या

रामटेक विधानसभेवर मशालच पेटणार: किशोरी पेडणेकर

चौफेर वार्ता
Last updated: September 21, 2024 5:26 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम
SHARE

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रामटेक विधानसभा महिला आघाडीच्या वतीने स्त्रि-शक्ती संवाद यात्रेच्यानिमित्ताने महिला मेळाव्याचे आयोजन मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत २० सप्टेंबर रोजीकनान शहर तालुका पारशिवनी रामटेक विधानसभा क्षेत्रात कुलदीप मंगल कार्यालय येथे नुकताच पार पडला.

यावेळी किशोरी पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामटेक विधानसभा क्षेत्रातील उपस्थित महिलांनी ‘मशाल’ घरा-घरात पोहचवण्याचे आश्वस्त करून वचन दिले. यावेळी किशोरी पेडणेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या राज्यात स्त्रि-अत्याचाराची प्रलंबित प्रकरणे आहेत, कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, महिला-युवती व माता-भगिनींच्या संरक्षणाची गरज आहे.

परंतु निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या तिजोरीचा गैरफायदा घेत’ मुख्यमंत्री लाडकी बहीण  योजना ‘राबविण्यासाठी जाहिरातीवर अव्वाढव्य खर्च करून राज्याची तिजोरी लुटणाऱ्या सरकारने महिलांना १५०० रुपये मासिक आर्थिक अनुदान देऊन स्त्रि-सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसुन येते.अशा राजकीय स्वार्थी धोरणामुळे खरच स्त्रि-सुरक्षा अबाधित राखल्या जाणार आहे का ?

असा प्रश्न यावेळी या महाघातकी सरकारला किशोरीताई पेडणेकर यांनी उपस्थित केला. तसेच राज्यातील स्त्रियांचे मतांतर करण्याचे सत्ताधाऱ्याचे हे स्वार्थी नियोजन निष्क्रिय करण्याचे आव्हानही यावेळी त्यांनी आयोजित महिला मेळाव्याला संबोधित करतांना केले. शिवसेना रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे (रामटेक विधानसभा प्रमुख) यांनी महिलेच्या सुरक्षितेतचा प्रश्न उपस्थित करून सरकारने महिलेच्या सुरक्षितेसंबंधीत ठोस पाऊले उचलली नसल्याने आज महिलांना असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे ते मार्गदर्शनात बोलत होते.

या सरकारने फक्त स्वतःची पाठ ठोकण्यासाठी जाहिरातबाजी व इव्हेंटवर करोडोचा खर्च करीत आहे. पण वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा, लोकांना शुद्ध पाणी, आरोग्य सेवा याकडे सरकारने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अश्या सरकारला आपण हद्दपार करणे गरजेचे आहे. त्यामुळे अश्या सरकारला धडा शिकविण्यासाठी व महविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी रामटेक विधानसभेतील सर्व महिलांनी हातात मशाल घेऊन क्रांती घडवून आणण्याची वेळ आली आहे. असा निर्धार महिला मेळाव्यातून त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, जिल्हा संपर्क संघटिका सुषमा साबळे, संपर्क संघटीका सोनाली म्हात्रे, निरीक्षक शालिनी सावंत, निधी शिंदे, मंदाकिनी भावे, सौ.वंदनाताई लोणकर, दुर्गा कोचे, मोनिका पौणिकर,व समस्त नगरसेवक / नगरसेविका, तसेच रामटेक विधानसभा मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article लाखनीत पंचायत समितीला ठोकले कुलूप : खंडविकास अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांसह सभागृहातून पलायन
Next Article विदर्भात भाजपला जोरदार धक्का बसण्याची शक्यता ?
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account