चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: माजी खासदार सुनील मेंढे यांची विविध विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा!
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > विदर्भ > माजी खासदार सुनील मेंढे यांची विविध विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा!
विदर्भ

माजी खासदार सुनील मेंढे यांची विविध विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा!

चौफेर वार्ता
Last updated: September 14, 2024 9:43 am
चौफेर वार्ता
Share
फोटो : टीम चौफेर
SHARE

>>>> शमीम आकबानी | भंडारा चौफेर

जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय आणि अन्य महत्त्वपूर्ण विषयाला घेऊन माजी खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांची भेट घेत विस्तृत चर्चा केली. दरम्यान, काही सूचनाही मेंढे यांच्याकडून करण्यात आल्या.

हेही वाचा : काँग्रेस खासदाराचा रील्ससाठी फवारा उडला नाही, म्हणून पुन्हा व्हिडिओ

भंडारा जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीचा माजी खासदारांनी आढावा घेतला. ज्या-ज्या गावांमध्ये पाणी शिरले आहे आणि लोकांना स्थलांतरित करण्यात आले. अशा लोकांना आवश्यक त्या सोयी सुविधा प्राधान्याने पुरविल्या जाव्या असे मेंढे यांनी सांगितले.

प्रामुख्याने, शेत पिकाच्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच वैनगंगा नदी काठावरील बपेरा, रेंगेपार, बोरी या गावांचा नदीच्या प्रभावामुळे भूस्खल्लन होऊन शेतजमिनी व घरे यांचे नुकसान झालेले असल्याने या गावांचे आपत्ती व्यवस्थापन विभगाअंतर्गत डीपीआर तयार करून नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेशाला नाकारलेल्या परवानगीच्या अनुषंगाने यावेळी चर्चा केली गेली.

हेही वाचा : …ते फर्मान सोडणारा तो ‘कटप्पा’ कोण?

आयोगाने आक्षेप घेतलेल्या त्रुटींवर ताबडतोब तोडगा काढून व्यवस्था उभारण्याचे माजी खासदारांनी सांगितले. गोसीखुर्द प्रकल्पात गाळ साचल्याने नेमका धरणातील पाण्याच्या पातळीचा अंदाज घेतला जाऊ शकत नाही. त्यामुळे गाळ काढण्याच्या संदर्भात सर्वेक्षण करून आराखडा तयार करण्यात यावा अशी सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना केली. भंडारा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बायपास चक्कर रोडवरील समस्या सोडविण्याच्या संदर्भात यावेळी सूचना करण्यात आल्या.

हेही वाचा : विघ्नहर्त्या, पुर ग्रस्तांना भरीव मदत देण्याची शासनाला सद्बुद्धी दे

सदर बैठकीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विपुल अंबाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सोयाम, कार्यकारी अभियंता थमके, विनोद बांते, अनुप ढोके, मयूर बिसेन, आशु गोंडाणे, सचिन कुंभलकर, सूर्यकांत इलमे आदी उपस्थित होते.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article साहेब, हद कर दी आपने…, काँग्रेस खासदाराचा रील्ससाठी फवारा उडला नाही, म्हणून पुन्हा व्हिडिओ 
Next Article महाविकास आघाडी दीडशे पार ? भाजपची झोप उडवणारा सर्व्हे!
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account