चौफेर प्रतिनिधी साकोली | स्थानिक विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण क्षेत्रात मुलभुत पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामिण भागात वास्तव्यास असलेल्या नागरीकांचा जीवनमानाचा दर्जा उचंवण्यासाठी काँगेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे विशेष लक्ष आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रात चौफेर विकास करण्याच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांचा निधी आपल्या क्षेत्रात खेचून आणण्याचा सपाटा आ.नाना पटोले यांनी सुरू ठेवला असून आ.पटोले यांच्या प्रयत्नाने विधानसभा क्षेत्रातील रस्ते विकास कामाकरीता ५०८१.६४ लक्ष रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रातील नागरीकांना सर्व सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरीता आ.पटोले यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.
साकोली विधानसभा क्षेत्रातील साकोली तालुक्यातील सावरबंध ते बोंडे रस्ता ३७१.०४ लक्ष,तसेच लांखादुर तालुक्यातील मांढळ गुंजेपार- बोथली- तई (बु.) रस्ता १६०१.३७ लक्ष, राज्यमार्ग ३५४ते कंराडला-राजणी- ढोलसर रस्ता १२७४.१९ लक्ष, मांढळ-सरांडी (बुज)
रस्ता ७४८.१९ लक्ष, तसेच लाखनी तालुक्यातील पेंढरी- केसलवाडा- रेंगाळा- मांगली- किटाडी रस्ता १०८६.८५ लक्ष रुपये. वरिल रस्त्यांच्या विकासासाठी आमदार नाना पटोले यांच्या प्रयत्नाने निधी मंजुर झालेला आहे व लवकर या विकास कामांना सुरुवात होणार असुन मुलभुत सुविधा उपलब्ध होणार असल्याने साकोली विधानसभा क्षेत्रामधील जनतेने आ.नाना पटोले यांचे आभार मानले आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रात दळणवळणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी चुलबंद नदीवर मोठ्या प्रमाणात पुलांचे बांधकाम तसेच रस्ते विकासाची कामे करण्यात आले आहेत.आता साकोली विधानसभा क्षेत्रात भौतिक विकासाची कामे झाल्याने त्याचा लाभ क्षेत्रातील जनतेला वर्षानुवर्ष मिळणार असल्याने जनतेत आनंद व्यक्त केल्या जात आहे.