चौफेर वार्ताचौफेर वार्ताचौफेर वार्ता
Font ResizerAa
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Reading: बाप्पा धाव रे… मला पाव रे…नेते, वारसदार, इच्छुकांची आरतीला उत्स्फूर्त हजेरी : वर्ष निवडणुकांचे असल्याने परमार्थाबरोबर स्वार्थाचेही चांगभलं
Share
Font ResizerAa
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Search
  • महाराष्ट्र
  • विधानसभा
  • राजकारण
  • विदर्भ
  • चौफेर वार्ता
  • क्राईम डायरी
Follow US
चौफेर वार्ता > राजकारण > बाप्पा धाव रे… मला पाव रे…नेते, वारसदार, इच्छुकांची आरतीला उत्स्फूर्त हजेरी : वर्ष निवडणुकांचे असल्याने परमार्थाबरोबर स्वार्थाचेही चांगभलं
राजकारणविदर्भ

बाप्पा धाव रे… मला पाव रे…नेते, वारसदार, इच्छुकांची आरतीला उत्स्फूर्त हजेरी : वर्ष निवडणुकांचे असल्याने परमार्थाबरोबर स्वार्थाचेही चांगभलं

चौफेर वार्ता
Last updated: September 10, 2024 4:18 pm
चौफेर वार्ता
Share
फोटो : चौफेर टीम राजकीय पोस्टर
SHARE

संदीप नंदनवार | भंडारा चौफेर

भावी आमदारकीचे स्वप्न मनोमनी रंगवित आगामी विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या विविध राजकिय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून तयारीचा श्रीगणेशा केला आहे. यामध्ये गणेश आगमनापासून विसर्जनापर्यंत विविध जबाबदाऱ्या स्वतःहून स्वीकारत हे इच्छुक पुन्हा सक्रिय झाले आहेत.

घरगुती गणपती विसर्जनाच्या दिवशीही बहुतांश इच्छुकांनी विसर्जन कुंडाची व्यवस्था आपआपल्या भागात करण्याचे बेत आखले आहेत. यंदा एप्रिल मे महिण्यात सात टप्प्यात लोकसभेची  निवडणूक पार पडल्यानंतर येत्या दोन महिण्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकिय पक्षातील इच्छूकांनी भावी आमदार बनत मुंबई सर करण्याची तयारी जोरात सुरू केली आहे. 

विधानसभेच्या निवडणुका आज किंवा उद्या जाहिर होतील, अशी अपेक्षा इच्छुकांना आहे. तसे झालेच तर किमान नोव्हेंबर वा डिसेंबर महिन्यात तरी निवडणुका होतील, असा अंदाज आहे. या कालावधीत निवडणुका झाल्याच तर अचानकपणे निवडणुकीस सामोरे जाण्यापेक्षा आतापासूनच त्याची मशागत करण्याचा प्रयत्न गणेशोत्सवाच्या माध्यमातून केला जात आहे.

जिल्ह्यात ४०६४ गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना झाली. यात ३ हजार ४३८ खासगी तर ६२६ सार्वजनिक गणेशमूर्तीचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील २९२ गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. मंडळांकडून विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसोबत विविध स्पर्धांचे आयोजन पार पडणार आहे.  त्यामुळे या मंडळांच्या संपर्कात गणरायाचे आगमन होण्याआधीच अनेक जण आहेत. 

या वर्षी मात्र निवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने त्यासाठी इच्छुकांनी गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला आहे. मंडळांना काय हवे काय नको, याची विचारपूस करत मदत देणे, प्रत्येक मंडळाच्या आरतीला आवर्जुन उपस्थिती लावणे, दिवसभरातील बराच काळ कार्यकत्यांसोबत घालवणे, असा दिनक्रमच काही जणांनी आखला आहे.

विधानसभा निवडणुकांची अधिसुचना  कोणत्याही क्षणी जाहिर होवू शकते याची जाणीव असल्याने नेते, वारसदार, कार्यकर्ते, इच्छुक कामाला लागले आहेत. राजकारणच मुळात तरुण मंडळांच्या उत्स्फूर्त सहभागावर अवलंबून असल्याने ‘दिल खोल के’ असा पवित्रा पुढाऱ्यांनी सोडला आहे.

मंडळांच्या विविध बाबींचा खर्च उचलण्याबरोबरच महाप्रसादाला लागेल ते देण्यापर्यंतची आर्थिक बाजू त्यांनी उचलल्याने मंडळांचा आनंदही द्विगुणीत झाला आहे. आरतीसाठी आर्थिक सुबत्ता असणाऱ्यांना पायघड्या घातल्या जात आहेत. रोख पावतीबरोबरच कायमस्वरूपी लागणाऱ्या साहित्याची मागणी मंडळांकडून होत आहे.

आमदार, खासदार, सरपंचांपर्यंत सर्वच मंडळींना बाप्पाच्या आरतीने उजळून काढले जात आहे. जिल्ह्यातील भंडारा – पवनी, तुमसर – मोहाडी व साकोली- लाखांदूर या तीन विधानसभांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या केव्हाही जाहीर होतील.

यामुळे जिल्ह्यातील शहरासह ग्रामीण भागातही बाप्पाच्या उत्सवात विविध राजकिय पक्षातील पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांची धांदल दिसत आहे. गावागावात अनेक दिवसांपासून तयारी केलेल्या, संपर्क कार्यालये थाटलेल्या इच्छुकांना आरतीला आणण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते कामाला लागले असून, संबंधितांच्या तारखांचे बुकिंगही केले आहे.

एकूणच मंडळे आपल्या बाजूला करून घेण्यासाठी इच्छुकही वाटेल ती किंमत मोजायला तयार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोणत्याही क्षणी निवडणुका होणार असल्याने इच्छुकांना तरुण मंडळांनी अर्थपूर्ण आरतीमध्ये सहभागी करून घेतले आहे. गावोगावी तरुण मंडळांमध्येही याबाबत ईर्षचे वातावरण असून, आपापल्या गटाबरोबरच विरोधकांनाही साकडे घालून आरतीला आणले जात आहे. आलेली आयती संधी का सोडावी, असा विचार करून इच्छुकही मौल्यवान आरतीचा आनंद घेत आहेत.


विविध माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न
यावेळची जिल्ह्यातील साकोली, भंडारा व तुमसर विधानसभा निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांना या मतदारसंघातील मतदारांसोबत संपर्क ठेवावा लागणार आहे. मतदारसंघातील मंडळापर्यंत पोहोचणे तितके से सोपे नाही याचीही जाणीव त्यांना आहे. तरीही प्रत्येक जण विविध माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे.


उत्स्फूर्तपणे पुढाऱ्यांची आरतीला हजेरी
आरतीला संधी मिळावी व मिरवता यावे यासाठी नेते, वारसदार, तसेच विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक मोठ्या देणग्या देत आरतीचा मान मिळवत आहेत. त्यामुळे मंडळ एक व आरती करणारे अनेक अशी स्थिती असून, उत्स्फूर्तपणे पुढाऱ्यांची आरतीला हजेरी दिसत आहेत.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp
Previous Article लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत होणार ?
Next Article मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ५० कोटी  रुपयाच्या निधी मंजुर : साकोली विधानसभा क्षेत्राचा चौफेर विकास
अजित पवार गटाला धक्का ; शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये
राजकारण
निष्ठा, प्रतिष्ठा,की…कार्यकर्त्यांची चेष्टा ; राजकारण तापले
चौफेर वार्ता राजकारण
थंडीतही राजकीय ‘गर्मी’ शिगेला ; गारठ्यातही नेते-कार्यकर्त्यांची ‘रन-बॅट’ सुरूच
राजकारण
नऊ-वर्षांनी रणशिंग! जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीत दिग्गज विरुद्ध नवे चेहरे
ताज्या बातम्या राजकारण
चौफेर वार्ताचौफेर वार्ता
Follow US
© Bhandarachaufer. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account