>>>भंडारा चौफेर | लाखनी
मुलाला शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाकडून पाच लाख रुपये घेऊन त्यांच्या मुलाला नोकरी न लावता फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार लाखनी येथे उघडकीस आला आहे. बेरोजगारीमुळे सध्या फसवणुकीचे प्रमाण वाढले गेले आहे. दैनंदिन जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात.
अशीच एक घटना, लाखनी शहरातील माजी सरपंच उर्मिला आगसे यांच्यासोबत घडली आहे. सण २०२२ मध्ये मुलाला शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिषखाली त्यांनी धारगाव येथील रहिवासी गैरअर्जदार राजू उर्फ दिनेश निंबार्ते यांना तब्ब्ल पाच लाख रुपये दिले होते. मात्र, मुलाला नोकरी न लावता आपल्या सोबत फसवणूक झाल्याचे आरोप करीत आगसे यांनी लाखनी पोलिसांना लिखित अर्ज दिला आहे.
या प्रकरणातील गैरर्जदार यांनी २०२२ साली मुलाला नोकरी लावून देतो या उद्देशातून अर्जदार यांचेकडून पाच लाख रुपये घेतले. मात्र, दोन वर्षाचा कालावधी लोटून अद्यापही नोकरी लावून दिली नाही. दरम्यान, पैश्याची मागणी करिता संपर्क साधले असता, गैरअर्जदाराकडून शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप आगासे यांनी केला आहे. शिवीगाळ केल्याचे आडिओ रेकॉर्डिंग सेव असल्याचे अर्जात नमूद केले आहे.
याप्रकरणी नोंद घेण्यात आली आहे. सदर गैरअर्जदाराला संपर्क साधला असून, पोलीस ठाण्यात येण्यास कळविले आहे. मात्र अद्याप गैरअर्जदार ठाण्यात आला नाही. पुढील चौकशी सुरु आहे.
-सुरेश आत्राम
पोलीस अधिकारी लाखनी
सदर अर्जदार माझे नातलग लागत असून,मी कुठल्याही नोकरीवर लावून देतो म्हणून, पैसे घेतले नाही. मागील काही दिवसाआधी त्यांचेकडून उसनवारी ४ लाख रुपये घेतले होते. आणि पैसे परत करण्यास मी इच्छुक आहे. मात्र, माझी प्रकृती बरी नसल्यमुळे दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो.
-राजू उर्फ दिनेश निंबार्ते, गैरअर्जदार