लाखनी | अवैध रेती वाहतुकीवर आळा बसविण्याकरीता पोलीस स्टेशन लाखनी येथील ठाणेदार हदयनारायण यादव यांनी पथके तयार करुन अवैध रेती वाहतुक करणारे एकुण ३ ट्रक्टर पकडुन त्याच्या ताब्यातुन २०लाख,६९ हजार,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक हदयनारायण यादव यांना मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन त्यांनी तयार केलेले रेड पथक मधील अंमलदार पोलीस हवालदार निलेश रामटेके, पोलीस शिपाई प्रतीक वाघाये, सचिन बुधे,नितीन बोरकर यांनी पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलीग करीत असतांना दि. १३ एप्रिल रोजी मौजा मासलमेटा येथे एक सिल्व्हर रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक्टर व त्याला जोडलेल्या निळ्या रंगाची ट्रॉलीमध्ये रेती चोरी करुन अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आल्याने ट्रक्टर चालक नामे देविदास पुंडलिक चवळे (वय ४० वर्षे,रा.लाखोरी, ता.लाखनी) यांचे ताब्यातुन एकुण ५ लाख, ६हजार ५००रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच दुसऱ्या घटनेत मोरगाव/राजे.येथे एक बिना नंबरचा सिल्व्हर रंगाचा आयशर ट्रक्टर ज्याच किंमत अंदाजे ६ लाख रुपये व लाल रंगाची बिना नंबरची ट्रॉली किंमत अंदाजे १ लाख रुपये मध्ये १ब्रास रेती किंमत ६५०९ रु.असा एकूण ७ लाख,६ हजार,५०० रुपयांचा मुद्देमाल आरोपी नामे श्रेयस मोरेश्वर नागदेवे (वय २२ वर्षे,रा. जांभळी,ता.साकोली) यांचे ताब्यातून जप्त करण्यात आला.
तसेच रेड पथक क्र.२ मधील पोहवा विनोद मरसकोल्हे पोशि हिवराज गायधने यांना मौजा राजेगाव/मोरगाव येथे एक बिना नंबरचा सिल्व्हर रंगाचा आयशर ट्रक्टर किंमत अंदाजे ७ लाख रु.व निळ्या रंगाची पिवळे पट्टे असलेली ट्रॉली किंमत अंदाजे १लाख ५० हजार रुपये मध्ये अंदाजे १ ब्रास रेती किंमत ६५००रु. असा एकूण ८ लाख,५६ हजार,५०० रुपयांचा मुद्देमाल आरोपी चांगदेव लव्हा राऊत(वय ४० वर्षे, रा.जांभळी/ सडक,ता.साकोली) यांचे ताब्यातुन जप्त करण्यात आला. व त्याचेविरुध्द विविध कलमान्वये लाखनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस अधिक्षक नूरुल हसन,अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हदयनारायण यादव,पोलीस हवालदार निलेश रामटेके,विनोद मरसकोल्हे, पोलीस शिपाई प्रतीक वाघाये, सचिन बुधे,नितीन बोरकर, हिवराज गायधने यांनी केलेली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा दिगांबर तलमले,गुलाब घासले,पंकज निरगुडे करीत आहेत.
अवैध रेती वाहतूक करणारे 3 ट्रॅक्टर पकडले ; 20 लाखाचा मुद्देमाल जप्त
लाखनी पोलिसांची कारवाई
